विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) दिल्या जाणाऱ्या विविध स्कॉलरशिप आता दर महिन्याला विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
यापूर्वी फेलोशिप (fellowship) तीन महिन्यांतून एकदा (क्वॉर्टरली बेसिस) एकत्रितपणे जमा व्हायच्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना आर्थिक बळ मिळण्यासाठी यूजीसीने हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी निर्णयाचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. युजीसीकडून दिल्या जाणाऱ्या फेलोशिप या तीन महिन्यांपासून एकदा बँक खात्यात जमा होत होती. मात्र, विद्यार्थ्यांना लागणाऱ्या आर्थिक मदतीची गरज लक्षात घेता, फेलोशिपची रक्कम दर महिन्याला डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांची जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा तीन महिन्यांची; तसेच एप्रिल २०२० पासूनची फेलोशिपची रक्कम बँकेत जमा करण्यात येणार असल्याचे प्रा. जैन यांनी सांगितले आहे. यासोबतच ऑक्टोबर २०२० साठीची फेलोशिप रक्कम डीबीटीद्वारे बँक खात्यात पाठवण्यात आली असून, नोव्हेंबरची रक्कम येत्या काही दिवसांत जमा होईल, अशी माहिती प्रा. जैन यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार फेलोशिपच्या रकमेचा उपयोग करता येणार आहे. 'ई-मेल आयडीवर तक्रार करा' विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळण्यात काही अडचणी असतील किंवा फेलोशिप मिळत नसल्यास, त्यांनी युजीसीच्या fellowshiphelpline.ugc@gmail.com या ई-मेल आयडीवर तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १८००१११६५७ या हेल्पलाइन क्रमांकावर कार्यालयीन दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Get complete Admission Guidance without stepping out of your house.
Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance
Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group
Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission
Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
JKSET 2023: Admit card released
सीएसआयआर नेट परीक्षेची तारीख जाहीर २०२३
UGC NET June 2023: Certificates/JRF award letters released
IGNOU December TEE 2023: Date sheet out
UGC NET 2023: Results declared
युजीसी नेट परीक्षा २०२३: परीक्षेचा निकाल जाहीर