Board Exams

Board Exams

दहावी परीक्षा निकाल २०२२: स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल

PUBLISH DATE 17th June 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च - एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच दहावी परीक्षेचा निकाल (SSC Result 2022) आज जाहीर होणार आहे.

दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. दहावीच्या निकालासंदर्भातील सर्व तपशील सर्वप्रथम महाराष्ट्र टाइम्स (Maharashtra Times) च्या वेबसाइटवर वाचता येणार आहेत. त्यामुळे आतापासूनच निकालाच्या प्रत्येक अपडेटसाठी 'मटा ऑनलाइन' (https://maharashtratimes.com/career) च्या अपडेटवर लक्ष ठेवा.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२२ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

दहावीच्या मार्च - एप्रिल २०२२ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होतील.

कुठे पाहाल निकाल?

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल -

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org


https://ssc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

SSC Result 2022 : असा पाहा निकाल
स्टेप १) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप २) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप ४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थिनी परीक्षा दिली. एकूण २२ हजार ९११ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. संपूर्ण राज्यातील ५०५० मुख्य केंद्र आणि १६ हजार ३३४ उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा घेण्यात आली.

दहावीच्या परीक्षा १५ मार्च २०२२ पासून सुरु झाल्या आणि नुकत्याच ४ एप्रिल २०२२ रोजी संपल्या. गतवर्षी करोना प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाइन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. याअंतर्गत बहुतांश परीक्षांची पहिली शिफ्ट सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या वेळेत सुरू होती. त्याचवेळी दुसऱ्या सत्राची वेळी दुपारी ३ ते ६.३० अशी होती.

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा