MSBSHSE Maharashtra Board HSC 12th Class Result 2025 Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने रविवारी बहुप्रतिक्षित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल सोमवारी (५ मे) जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून mahahsscboard.in, hscresult.mkcl.org, education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results आणि results.digilocker.gov.in या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन निकाल पाहता येतील. तर, महाविद्यालयांना आवश्यक कॉलेज लॉग-इनसह mahahsscboard.in वर एकत्रित निकाल पाहता येतील.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचे निकाल जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बारावीच्या परीक्षेनंतर विविध प्रवेश परीक्षांसह उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून, महाराष्ट्र राज्य मंडळाने नेहमीपेक्षा लवकर बारावीच्या परीक्षा सुरू केल्या होत्या. त्यामुळे या परीक्षेचा निकालही लवकर लावण्यात येत आहे.
मुद्दे | तपशील |
परीक्षेचे नाव | महाराष्ट्र उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा २०२५ |
निकाल | महाराष्ट्र HSC निकाल २०२५ |
परीक्षा आयोजित करणारी संस्था | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) |
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ | mahresult.nic.in |
लॉग इनसाठी आवश्यक तपशील | परीक्षा क्रमांक आणि आईचे पहिले नाव |
महाराष्ट्र HSC निकालाची तारीख | ५ मे २०२५, दुपारी १ नंतर |
एकूण विद्यार्थ्यांची संख्या | सुमारे १५ लाख विद्यार्थी |
निकाल स्थिती | जाहीर होणे बाकी आहे |
Maharashtra Class 12th Result Updates 5 May 2025: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाचे अपडेट्स
Maharashtra HSC 12th Result 2025 : बारावीचा निकाल यंदा का घटला?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ९१.८८ टक्के निकाल लागला.
MAHA HSC Result 2025 Maharashtra Live Updates: "स्वप्नांच्या दिशेने नेणारा निर्णायक क्षण", शरद पवारांनी खास शब्दांत केले बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
यंदाचा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे खास शब्दांत अभिनंदन केले आहे. एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांनी म्हटले की, “इयत्ता बारावी हा शैक्षणिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ही परीक्षा केवळ शैक्षणिक प्रवासातील एक पायरी नसून, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील स्वप्नांच्या दिशेने नेणारा एक निर्णायक क्षण आहे. या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!”
MAHA HSC Result 2025 Maharashtra Updates: उत्तीर्णतेची टक्केवारी घसरली
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालात यावर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी थोडीशी घसरून ९१.८८% वर आली आहे. मागील वर्षीच्या ९३.३७% उत्तीर्णतेच्या टक्केवारीच्या तुलनेत, या वर्षीच्या निकालात १.४९% ची घट दिसून आली आहे.
Maharashtra HSC 12th Board Result 2025 : १२ वी उत्तीर्ण, आता पुढे काय करायचं? वाचा, करिअरच्या 'या' नव्या चांगल्या संधी
Career Options after HSC 12th Board : १२ वीनंतर तुम्ही हे कोर्सेस करुन चांगल्या पॅकेजची नोकरी मिळवू शकता.
MAHA HSC Result 2025 Maharashtra Updates: बारावीच्या परीक्षेचा शाखानिहाय निकाल
आज जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात राज्यात विज्ञान शाखेत सर्वाधिक ९७.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर वाणिज्य शाखेतून ९२.६८ टक्के, व्यावसायिक शाखेतून ८३.२६ टक्के आणि कला शाखेतून ८०.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
MAHA HSC Result 2025 Maharashtra Updates: बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीची ३६६
यावर्षी मार्च २०२५ मध्ये झालेल्या १२ वीच्या परीक्षेमध्ये १२४ केंद्रावर कॉपीची प्रकरणे आढळली आहेत. ज्या केंद्रांवर ही प्रकरणी आढळली त्याची चौकशी करून ही केंद्रे पुढील परीक्षेपासून कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहेत. परीक्षेच्या कालावधीत १२४ केंद्रांवर ३६६ कॉपी केसेस समोर आल्या, तर या सर्व केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करणार असल्याचे महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं.
MAHA HSC Result 2025 Maharashtra Updates: बारावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार करण्याची संधी
आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालानंतर, जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असूनही त्यांना श्रेणीसुधार करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना येत्या तीन परीक्षा, अर्थात जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ आणि जून-जुलै २०२६ या तिन्ही वेळी किंवा त्यापैकी एका परीक्षेला बसण्याची संधी असेल.
या परीक्षांमध्ये बसल्यानंतर विद्यार्थ्याचे गुण वाढल्यास किंवा कमी झाल्यास आधीची गुणपत्रिका कायम ठेवायची की नव्याने उत्तीर्ण झालेली गुणपत्रिका कायम ठेवायची, हे ठरवण्याचा अधिकार विद्यार्थ्याला असेल. त्यासाठी विद्यार्थ्याला सहा महिन्यांची मुदत दिली जाईल. यानंतर दुसरी गुणपत्रिका विद्यार्थ्याने मंडळाकडे परत द्यायची आहे, असं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जुलै २०२४ पासून हे बदल करण्यात आले आहेत.
MAHA HSC Result 2025 Maharashtra Updates: बारावीचा निकाल कसा तपासायचा?
महाराष्ट्र बोर्डाच्या खालीलपैकी कोणत्याही वेबसाइटवर जा– mahahsscboard.in, mahresult.nic.in, mahahsscboard.org, hscresult.mkcl.org, education.indianexpress.com आणि results.digilocker.gov.in.
होमपेजवर ‘महाराष्ट्र बारावी निकाल २०२५’ लिंकवर क्लिक करा
दिलेल्या पर्यायांमध्ये परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव भरा
आता, महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल २०२५ पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी व्ह्यू रिझल्ट पर्यायावर क्लिक करा.
Mahresult.nic.in, Maharashtra Board HSC 12th Class Result 2025 Updates: : निकालाची ठळक आकडेवारी
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये ७५ आणि त्याहून अधिक टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १,४९,९३२ इतकी आहे. ६० ते ७४.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४,०७,४३८ इतकी आहे. तर ४५ ते ५९.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५८०९०२ इतकी आहे.
MAHA HSC Result 2025 Maharashtra Updates: विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती
महाराष्ट्र बारावी २०२५ चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे संपर्क क्रमांक महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
HSC Result 2025 Maharashtra Updates: निकाल पडताळणीच्या तारखा जाहीर
आज जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालांवर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी नोंदणी करण्यासाठी २० मे पर्यंत वेळ आहे. बारावी निकाल २०२५ च्या पुनर्मूल्यांकनासाठी नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करावा लागेल.
HSC Result 2025 Maharashtra Updates: २०२७-२८ मध्ये दहावी-बारावीचा नवीन अभ्यासक्रम येणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. या पत्रकार परिषदेत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २०२७-२८ मध्ये दहावी-बारावीचा नवीन अभ्यासक्रम येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे पुढील परीक्षा त्यानुसार घेतल्या जातील.
HSC Result 2025 Maharashtra Updates: राज्यात ३८ महाविद्यालयांतील एकही विद्यार्थी उत्तीर्ण नाही
महाराष्ट्र बोर्डाने आज जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात राज्यातील एकूण १०,४९६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यापैकी ३८ महाविद्यालयांतील एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही.
HSC Result 2025 Maharashtra Updates: राज्यातील सुमारे २ हजार महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १०,४९६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १,९२९ महाविद्यालयांतील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
HSC Result 2025 Maharashtra Updates: पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल ३७.६५ टक्के
गेल्यावेळी बारावीच्या परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या एकूण ४२,३८८ विद्यार्थ्यांनी यंदाच्या परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी केली होती. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजेच उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ टक्के आहे.
HSC Result 2025 Maharashtra Live Updates: यंदा एकाही विद्यार्थ्याला नाहीत १०० टक्के गुण
महाराष्ट्र बारावीच्या बारावीच्या निकालात एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळालेले नाहीत. तब्बल ४,५०० विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
HSC Result 2025 Maharashtra Updates: गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी २० मे पर्यंत मुदत
गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना २० मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी वेगळे शुल्क भरून मिळाल्याशिवाय विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकणार नाहीत.
HSC Result 2025: बारावीच्या परीक्षेत २० हजार विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये २०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळाले आहेत. क्रीडा किंवा स्काउट आणि गाईड उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना हे अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत.
HSC Result 2025: ३७ विषयांमध्ये १००% विद्यार्थी उत्तीर्ण
या वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १५४ विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी ३७ विषयांमध्ये १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Maharashtra HSC 12th Result 2025: बारावीचा निकाल लागला, पुढे काय? कसा कराल श्रेणी सुधार किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज?
HSC Results Announced: बारावीच्या परीक्षांचे निकाल महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केले असून त्यासोबत श्रेणीसुधार, पुनर्पडताळणी व पुनर्मूल्यांकनाची प्रक्रियाही स्पष्ट केली आहे.
Maharashtra HSC Result 2025 Marksheet: बारावीचा निकाल लागला! तुमची गुणपत्रिका, ई-मार्कशीट आणि प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करावे, जाणून घ्या सोपी पद्धत
महाराष्ट्र बोर्डच्या बारावीच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी २०२५ च्या तात्पुरत्या स्वरुपातील बारावीच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्र आणि ई-मार्कशीट डाउनलोड करण्याची प्रक्रिया समजून घेऊ शकतात.
HSC Result 2025: विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.३५ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.३५ टक्के इतका लागला आहे.
शाखांनुसार बारावीचा निकाल खालीलप्रमाणे;
विज्ञान: ९७.३५%
कला: ८०.५३%
वाणिज्य: ९२.६८%
व्यावसायिक: ८३.३%
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ दरम्यान बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुलींसह १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |
We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.
Digilocker CBSE Result 2025 Access Code
Maharashtra SSC Results 2025 Date And Time
MAH SSC HSC Board RESULT 2025 Date And Time
CBSE Class 10 And 12 Result Will Soon Declare At cbse.gov.in
ICSE, ISC Results 2025 Date And Time
Maharashtra SSC, HSC Results 2025
CBSE Class 10th & 12th Result 2025 Expected Date
CBSE Board result 2025 for 10th, 12th
SSC Exam Result 2025
CBSE Class 12th Board exam 2025 concludes
ICSE, ISC Board Exam Results Date 2025
Board Results 2025
CBSE Class 12 History Paper Review 2025
CBSE 10th Maths analysis 2025
CBSE Class 12th English Exams 2025
CBSE Class 12 English Sample Paper 2025
CBSE’s two-tier science and social science papers
CBSE to roll out two-tier science and social science
CBSE Class 10 Social Science Exam
CBSE Class 12th Business Studies today
CBSE to seek public feedback on biannual exams proposal
SSC Exam : राज्यात दहावीचे १६ लाख विद्यार्थी देणार परीक्षा
CBSE Class 10 Sample Paper
CBSE 10th Exams 2025
CBSE Board Exams 2025
Maharashtra Board Exam 2025:
CBSE Board Exams 2025
CBSE Board Exams:
CBSE Board Exam 2025
CBSE Date Sheet 2025 Out
CBSE Board 2025 Exams
CBSE Board Exams 2025
CBSE Board Exam 2025: Check Marking Scheme, Sample Paper
Maharashtra HSC, SSC supplementary exams results 2024 out
UK Board Compartment Result 2024 Out
SSC HSC Board Exam Date
CBSE Class 10th, 12th Revaluation Lot 2 Result 2024 Released
SSC HSC Supplementary Exam
CBSE Compartment Admit Card 2024 Released
CBSE 10th, 12th Revaluation Result 2024 Declared
CBSE Supplementary Exam 2024 Admit Card
बारावीच्या पुरवणी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
दहावीची गुणपत्रिका ११ जूनला मिळणार.
SSC-HSC Supplementary-2024
12th Supplementary Exam
Maharashtra Board SSC Result 2024 Date and Time
CBSE 10th, 12th Compartment Exam Date 2024 Announced
10 Board Exam News : दहावी परीक्षेच्या शुल्कात वाढ
दहावी-बारावीनंतरच करा स्पर्धा परीक्षेची तयारी
CISCE Board 10th 12th Toppers List 2024
ICSE, ISC Result 2024
CBSE Board Exam Result 2024
Maharashtra HSC Result 2024 Date And Time
HP Board Class 12th Result 2024 Date And Time
JAC 12th Result 2024 Date
UK Board 2024: Class 10, 12 Result To Be Out On April 30
MP Board 5th, 8th Result 2023: Results soon
Goa Board Class 12 Result Annouced
Manabadi.co.in SSC Results AP Board:
AP SSC Toppers List 2024:
MP Board Result 2024 Date And Time:
UP Board Result 2024
JAC 10th Toppers List 2024:
JAC 10th Result 2024 Date And Time Out
PSEB 10th Result 2024 Out
MPBSE Result 2024
Tamil Nadu Board Results 2024
Gujarat Board Result 2024
PSEB Class 10th Result 2024 Date And Time
JAC Board Class 10 Result 2024 Likely To Be Released On April 20
PSEB Result 2024 Date And Time
Gujarat Board Result Date 2024
MP Board Result 2024 Date And Time
Jharkhand Board Result 2024 Date
Haryana Board 2024
Karnataka 2nd PUC Result 2024:
CBSE Board Exam Result Date 2024
ICSE ISC Board Exam Result 2024
MP Board Result 2024
Karnataka Board PUC 2nd Year Result 2024 Declared
MP Board Result 2024
UP Board Result 2024 Date And Time