Board Exams

Board Exams

SSC HSC Board Exam Date

PUBLISH DATE 13th August 2024

पुणे - विद्यार्थ्यांनो, तुम्ही दहावी-बारावीच्या परीक्षेची तयारी करत असाल, तर तुमचे अभ्यासाचे वेळापत्रक थोडेसे अलीकडे घेऊन ठेवा. होय, कारण राज्य मंडळाने यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, दरवर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा आठ ते दहा दिवस अगोदरच सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणारी बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

राज्य मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्य मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाते. तर बारावीचा निकाल मे महिन्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणत: जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाते.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जातात. अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा, तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकालही लवकर जाहीर करणे, याचा सारासार विचार करता फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणारी बारावी-दहावीची परीक्षा नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस आधी आयोजित करण्याचा राज्य मंडळाचा मानस आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले. त्यानुसार दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा राज्य मंडळाने जाहीर केल्या आहेत.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने, तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर केल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच या तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या २३ ऑगस्टपर्यंत ‘secretary.stateboard@gmail.com’ या ईमेलवर पाठवाव्यात, असे राज्य मंडळाने नमूद केले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेच्या नियोजित तारखा :

तपशील : लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी

  • बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५

  • बारावी- प्रात्यक्षिक,श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन : २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५

  • दहावी परीक्षा : २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५

  • दहावी- प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२५

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.


Related News


SSC HSC Board Exam Date
14th September 2024

CBSE Board Exams 2025

SSC HSC Board Exam Date
25th May 2024

12th Supplementary Exam

SSC HSC Board Exam Date
5th May 2024

ICSE, ISC Result 2024

SSC HSC Board Exam Date
25th April 2024

JAC 12th Result 2024 Date

SSC HSC Board Exam Date
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

SSC HSC Board Exam Date
20th April 2024

UP Board Result 2024

SSC HSC Board Exam Date
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

SSC HSC Board Exam Date
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

SSC HSC Board Exam Date
18th April 2024

MPBSE Result 2024

SSC HSC Board Exam Date
17th April 2024

Gujarat Board Result 2024

SSC HSC Board Exam Date
13th April 2024

Haryana Board 2024

SSC HSC Board Exam Date
11th April 2024

MP Board Result 2024

SSC HSC Board Exam Date
8th April 2024

MP Board Result 2024

SSC HSC Board Exam Date
4th April 2024

UK Board Result 2024:

SSC HSC Board Exam Date
21st March 2024

5th to 11th board exams

SSC HSC Board Exam Date
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

SSC HSC Board Exam Date
14th March 2024

Karnataka govt

SSC HSC Board Exam Date
14th March 2024

CBSE Board Exams 2024

SSC HSC Board Exam Date
4th March 2024

BSEB Result 2024