Higher Education

Higher Education

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी

PUBLISH DATE 17th June 2024

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स गणेशखिंड पुणे ("मॉडर्न कॉलेज गणेशखिंड" म्हणून प्रसिद्ध) या पुण्यातील अग्रगण्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीयख्यातीचा बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी  अभ्यासक्रम आहे.  मेलबर्न विद्यापीठाच्या सहकार्याने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुसार याची रचना आहे. मेलबर्न विद्यापीठ ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च तर जागतिक  क्रमवारीत तेराव्या क्रमांकावर आहे.

इतर पदवी अभ्यास क्रमांमध्ये फक्त एकाच विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळते. बी एस्सी ब्लेंडेड  हा एकमेव पदवी अभ्यासक्रम आहे जिथे विद्यार्थ्यांना दोन विद्यापीठांकडून प्रमाणपत्रे मिळतात आणि   परदेशात न जाता पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची पदवी मिळते.

तुम्हाला बारावी सायन्स नंतर  रसायनशास्त्र, संगणक किंवा जीवशास्त्रात करिअर करायचे आहे का? मग तुम्ही मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे B.Sc. Blended पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्या आणि तुमच्या   करिअरची   क्षितिजे रुंदावा. 

बारावी ला रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा गणित  असणारे विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात .

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तीन किंवा चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया एकच आहे. विद्यार्थ्यांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत.  प्रत्येक पर्यायासाठी प्लेसमेंट सेलद्वारे करिअर मार्गदर्शन केले जाते.

पर्याय 1]

बी.एस्सी. ब्लेंडेड ची तीन वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर. विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाण पत्रा व्यतिरिक्त मेलबर्न विद्यापीठाचे वेगळे गुणवत्ता हमी प्रमाणपत्र मिळते. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी जगभरात अर्ज करू शकतात. रसायनशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, फॉरेन्सिक इत्यादी सर्व शाखांसह 25 पेक्षा जास्त विषयांसाठी मास्टर्स प्रोग्रामसाठी अर्ज करण्यास पात्र. गुणवंत विद्यार्थ्यांना नियमानुसार शिष्यवृत्ती मिळते. उच्च शिक्षणासाठी मेलबर्न विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या बी.एस्सी. ब्लेंडेड च्या विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती मिळते.

पर्याय 2]

तिसरे  वर्ष पूर्ण केल्यावर पदवीच्या चवथ्या वर्षाला प्रवेश घेता येतो. चार वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी आणि मेलबर्न विद्यापीठातून गुणवत्ता हमी प्रमाणपत्र मिळते.

पर्याय 3]

बी एस्सी ब्लेंडेड ची पहिली दोन वर्षे मॉडर्न कॉलेज  गणेश खिंड येथे पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पुढील दोन वर्षांसाठी मेलबर्न विद्यापीठात प्रवेश घेऊ शकतात. चार वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, मेलबर्न विद्यापीठाची पदवी दिली जाते.

चार वर्षांच्या पदवीमध्ये चांगली शैक्षणिक गुणवत्ता असणारा विद्यार्थी  काही निवडक विद्यापीठांमध्ये थेट पीएच.डी.साठी प्रवेश घेता येतो.  इतर विद्यार्थी मास्टर्स साठी प्रवेश घेतात.

मेलबर्न विद्यापीठ, आय सर आणि मॉडर्न कॉलेज च्या मॉडर्न कॉलेजच्या तज्ज्ञांनी बी एस्सी ब्लेंडेडचा  अभ्यासक्रम तयार केला आहे त्यामुळे याचा शैक्षणिक दर्जाही उच्च आहे. अंतिम वर्षात प्रोजेक्ट  सक्तीचा आहे. ज्यामुळे कौशल्य विकास होतो. मॉडर्न कॉलेजमध्ये  संशोधन केंद्र आणि सेंट्रल इंस्ट्रूमेंटेशन फॅसिलिटी आहे. एखाद्या चांगल्या प्रोजेक्ट मधून  शोधनिबंध किंवा पेटंट मिळू शकते. बी एस्सी ब्लेंडेड च्या कार्यकाळात विद्यार्थी  देश-विदेशातील तज्ज्ञांशी संवाद साधतात. शेवटच्या वर्षी मेलबर्न विद्यापीठातील प्रयोग शाळां मध्ये काम करण्याची संधी मिळते. सुट्टी मध्ये इंटर्नशिप करता येते.

बी एस्सी ब्लेंडेड च्या पहिल्या दोन वर्षांमध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित हे विषय अनिवार्य आहेत. याशिवाय इंग्रजी आणि कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग आहे. बारावीत गणित किंवा जीवशास्त्र नसलेल्यांसाठी ब्रिज कोर्स असतो.

तिसऱ्या वर्षात रसायनशास्त्राच्या मुख्य विषयांव्यतिरिक्त विद्यार्थी विज्ञान, कला आणि वाणिज्य या कोणत्याही शाखेतून इलेक्टिव्ह निवडू शकतो. विद्यार्थ्यांना प्रोजेक्टचा विषय आणि लॅब  निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.

1992 पासून, मॉडर्न कॉलेज गणेशखिंड हे पदवी शिक्षण प्रक्रियेत सहभागी झाले आहे. 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन विकसित करणारे अनुभवी प्राध्यापक येथे आहेत.  महाविद्यालय अभ्यासाव्यतिरिक्त इतर कला गुणांना प्रोत्साहन देते. कॉलेज मध्ये एन सी सी,,   एन एस एस, इंडिअन रेड क्रॉस चे युनिट आहे. अनेक बी एस्सी ब्लेंडेड विद्यार्थ्यांचा  नदी पुनर्संचयन प्रकल्प, संशोधन प्रकल्प, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमात सहभाग असतो. विद्यार्थी त्यांचे संशोधन कॉनफेरेन्स मध्ये  सादर करतात. विज्ञान प्रदर्शनातही विद्यार्थी सहभागी होतात. याचे त्यांना गुण मिळतात. परिणामी, विद्यार्थी शैक्षणिक तसेच अभ्यासेतर उपक्रमांमध्ये चांगली कामगिरी करतात. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो. या सर्व बाबींचा विचार करून, विद्यार्थी  प्राध्यान्याने  बीएससी ब्लेंडेडसाठी मॉडर्न कॉलेज गणेशखिंड ची निवड करतात. परदेशात न जाता आंतरराष्ट्रीय ख्यातीची पदवी मिळव तात. साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश सुरू होतात. तपशीलांसाठी, modgk.chem.bscblended@gmail.com, WhatsApp:- 91-9822749483, 91-9923367452 वर लिहा. www.moderncollegegk.org वर वैयक्तिकरित्या किंवा कॉलेज ला प्रत्यक्ष भेट द्या.

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
7th October 2024

CBSE Date Sheet 2025

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
3rd October 2024

MAH CET 2024 Admission

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
21st September 2024

BTech in AI vs BTech in CSE

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
21st September 2024

AIBE 19 registration underway

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
16th September 2024

SSUHS GNM Result 2024 Released

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
14th September 2024

TS ICET counselling 2024

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
12th September 2024

DU UG Admission 2024

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
12th September 2024

UPTAC Counselling 2024

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
11th September 2024

FMGE December 2024

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
10th September 2024

RTMNU Admission 2024

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
5th September 2024

IIM Admission Process

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
5th September 2024

AYUSH NEET UG Counselling 2024

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
29th August 2024

AP BArch Admissions 2024

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
26th August 2024

AP EAMCET 2024 Counselling

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
26th August 2024

ICSI CS June 2024 Result

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
26th August 2024

DU UG Admission 2024

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
24th August 2024

NEET PG 2024 Result Declared

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
23rd August 2024

Top 5 Engineering Colleges

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
22nd August 2024

DU Admissions 2024

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित बी. एस्सी. ब्लेंडेड पदवी
2nd August 2024

DU UG Admission 2024