GATE

GATE

गेट परीक्षा २०२२: आयआयटी खडगपूर करणार परीक्षेचे आयोजन

PUBLISH DATE 28th May 2021

आयआयटी मुंबई (IIT Bombay) द्वारे ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग 2021 (GATE 2021) चे यशस्वीपणे आयोजन केल्यानंतर गेट 2022 (GATE 2022) ची तयारी सुरू झाली आहे.

यावेळी परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी खडगपूर (IIT KGP) कडे आहे. आयआयटी मुंबईचे अध्यक्ष प्रा. सुभाशीष चौधरी यांनी आयआयटी खडगपूरचे अध्यक्ष वीरेंद्र कुमार तिवारी यांच्याकडे परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सुपूर्द केली आहे.

ही परीक्षा इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी असणाऱ्या किंवा इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेद्वारे आयआयटीसह अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये एमटेक अभ्यासक्रमांना प्रवेश (MTech Admission) मिळतो. याव्यतिरिक्त सरकारी संस्थादेखील गेट स्कोर (GATE Score) च्या आधारे नोकरी देतात.

यावर्षी देखील मिळणार सवलत?

गेट 2021 मध्ये आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांना सवलत दिली होती. कोविड-१९ महामारीमुळे अनेक महाविद्यालयांमध्ये परीक्षा झाली नव्हती तर अनेक महाविद्यालयांचे निकाल जाहीर झाले नव्हते. विद्यार्थ्यांमध्ये यामुळे गोंधळाचे वातावरण होते की त्यांना तृतीय वर्षाचे विद्यार्थी म्हणून ग्राह्य धरणार की चौथ्या वर्षाचे विद्यार्थी म्हणून ग्राह्य धरणार. त्यामुळे तृतीय वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील गेट परीक्षेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. जर यंदाही सद्यस्थितीत सुधारणा झाली नाही आणि परीक्षा-निकालाला विलंब झाला तर यंदादेखील ही सवलत दिली जाऊ शकते.

गेट 2022 (GATE 2022) चे नोटिफिकेशन अद्याप जारी करण्यात आलेले नाही. या नोटिफिकेशनसह अॅप्लिकेशन डिटेल्स आणि परीक्षेची माहिती दिली जाईल. ही परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे.

CBSE 10th result: गुणांकन पद्धतीबाबत FAQ; कसे मिळणार मार्क, जाणून घ्या

गेट 2021 परीक्षेत 'ह्यूमॅनिटीज' (Humanities) या नव्या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. पहिल्याच वेळी १४,१९६ विद्यार्थ्यांनी या विषयासाठी अर्ज केला होता. यापैकी ८,६३४ विद्यार्थीनी होत्या. गेट २०२१ मध्ये एकूण ८,८२,६८४ विद्यार्थी सहभागी झाले होते. हे प्रमाण 2020 पेक्षा अधिक होते, २०२० मध्ये ८.५९ लाख विद्यार्थ्यांनी गेट परीक्षा दिली होती.

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


गेट परीक्षा २०२२: आयआयटी खडगपूर करणार परीक्षेचे आयोजन
16th March 2023

GATE 2023: Result Soon

गेट परीक्षा २०२२: आयआयटी खडगपूर करणार परीक्षेचे आयोजन
22nd February 2023

GATE 2023: Answer key released

गेट परीक्षा २०२२: आयआयटी खडगपूर करणार परीक्षेचे आयोजन
3rd January 2023

GATE 2023: Admit Card Update

गेट परीक्षा २०२२: आयआयटी खडगपूर करणार परीक्षेचे आयोजन
5th December 2022

GATE 2023: FAQs

गेट परीक्षा २०२२: आयआयटी खडगपूर करणार परीक्षेचे आयोजन
28th November 2022

GATE 2023: Schedule released

गेट परीक्षा २०२२: आयआयटी खडगपूर करणार परीक्षेचे आयोजन
24th October 2020

GATE 2021 Updates

गेट परीक्षा २०२२: आयआयटी खडगपूर करणार परीक्षेचे आयोजन
14th March 2020

GATE 2020 result declared

गेट परीक्षा २०२२: आयआयटी खडगपूर करणार परीक्षेचे आयोजन
19th February 2020

GATE answer key released 2020

गेट परीक्षा २०२२: आयआयटी खडगपूर करणार परीक्षेचे आयोजन
9th February 2020

GATE CSE Paper 2020 Analysis