Engineering

Engineering

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात बी. ई. किंवा बी. टेक प्रवेशासाठी हवे ९० पेक्षा जास्त पर्सेंटाईल

PUBLISH DATE 7th December 2021

तुम्ही अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत असाल, तर नक्की इकडे लक्ष द्या. पुण्यातील नामांकित महाविद्यालयात बी. ई. किंवा बी. टेक. अभ्यासक्रमाला प्रवेश हवा असेल, तर तुम्हाला प्रवेश परीक्षेत किमान ९० पर्सेंटाईल किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे.

होय, शहरातील नामांकित महाविद्यालयातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीतील ‘कट-ऑफ’ हा नव्वदीपार आहे. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशासाठी आणि त्यातही आवडती शाखा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येते.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाची पहिली फेरी जाहीर झाली आहे. या फेरीतील कट-ऑफ देखील सीईटी सेलने जाहीर केला आहे. पहिल्या फेरीत नामांकित महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी), आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड डेटा सायन्स शाखांचा कट-ऑफ ९९ ते ९० पर्सेंटाईल असा सर्वाधिक असल्याचे दिसून येते. तर, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (ई ॲण्ड टीसी), मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशा शाखांमध्ये तुलनेने कमी पर्सेंटाईल असले, तरीही प्रवेशाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.


 

अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या एकूणच निकालात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा प्रवेशाचा ‘कट-ऑफ’देखील वाढल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांकडून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला जास्त पसंती असल्याने या शाखेसाठीचा कट-ऑफ हा तुलनेने अधिक आहे. परंतु, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, अर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड डेटा सायन्स अशा शाखांनाही विद्यार्थी प्राधान्य देतात. विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि त्यांच्याशी संबंधित अभ्यासक्रमांना विद्यार्थी-पालकांकडून पसंती दिली जात आहे.

- डॉ. कल्याणी जोशी,

प्राचार्य, पीईएस मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग

कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट-ऑफ हा ‘टॉप’ला आहे. सध्या सर्वच क्षेत्रात डिजिटायझेशनला असणारे प्राधान्य लक्षात घेता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जास्त नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. त्या तुलनेत लॉकडाउननंतर देखील उत्पादन आणि ॲटोमोबाईल क्षेत्र म्हणावे तितके स्थिरावलेले नाही. या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकर भरतीत सातत्य नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगकडे जाण्याला विद्यार्थी पसंती देत नसल्याचे दिसून येते.

- डॉ. डी. आर. पानगव्हाणे,

प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द)

अभियांत्रिकीबरोबरच हे करणे शक्य

  1. मल्टी डिसिप्लिनरी अभ्यासक्रम निवडणे

  2. कौशल्यावर आधारित कोर्सेस करणे

  3. अभ्यासक्रमाशी संबंधित सर्टिफिकेट कोर्सेस करणे

--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News