Board Exams

Board Exams

12th Board Exam

PUBLISH DATE 20th January 2024

दहावी, बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा. योग्य मार्गदर्शन आणि चिकाटीच्या जोरावर विद्यार्थी भविष्यातील संधींना गवसणी घालतात. दहावी-बारावी तर भावी करिअरची जणू लिटमस टेस्टच. आता ही टेस्ट यशस्वी करण्याची वेळ आली आहे. शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. अंतिम वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान; तर दहावीची बोर्ड परीक्षा १ ते २६ मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. त्यानुसार पुढच्या दोन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचा असणार आहे.

बारावीच्या परीक्षेला एक; तर दहावीच्या परीक्षेला केवळ दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी केवळ रात्रंदिवस अभ्यास करणे आवश्यक नाही, तर त्यासाठी मुलांचे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहणेदेखील आवश्यक आहे. परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि स्मरणशक्तीचे गणित विद्यार्थ्यांना आताच जुळवावे लागणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांचा कालावधी नियोजनबद्ध अभ्यासक्रमाचा असणार आहे. त्यासाठी या काळात पालकांनी मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.बारावीचे हॉल तिकीट

बारावीचे हॉल तिकीट सोमवारपासून

बारावी परीक्षेसाठी ऑनलाइन हॉलतिकीट सोमवारपासून (ता. २२) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महाविद्यालयांनी प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत. त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रातील दुरुस्त्या महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत, असा शेरा द्यावा, अशा सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत.

हे अवश्‍य करा

  • अभ्यासाचे वेळापत्रक करा

  • नियमित जुन्या प्रश्नपत्रिका

  • सोडवा, सराव करत राहा

  • रोज पोषक आहार घ्या

  • अभ्यासासोबतच थोडे मनोरंजनही गरजेचे

  • अभ्यास करताना कंटाळा आल्यास मध्येच पाणी प्या, त्यामुळे ताजेतवाने वाटेल.

  • नियमित व्यायाम करा

हे नक्की टाळा

  • मोबाइलपासून दूर राहा

  • रात्रीची झोपमोड करून अभ्यास मुळीच नको

  • शिळे अन्न ग्रहण करू नका

  • तासन्‌तास एकाच ठिकाणी अभ्यासाला बसू नका

  • या काळात आरोग्यही महत्त्वाचे. त्यामुळे फास्टफूडचे सेवन करणे टाळा

  • ------------------------------------------------------------------------------------

    VidyarthiMitra.org

    Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

    Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

    Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

    Call 77200 25900 or 77200 81400                   

    11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

    We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
    Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

    | Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
     Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
    करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

    नकारात्मक विचार दूर सारा

पालकांनो, मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या

बारावीची परीक्षा जवळ आली आहे. मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले असल्याशिवाय परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाहीत. त्यासाठी पालकांनी मुलांच्या डाएट प्लॅनकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुले परीक्षा जवळ आली की, तयारीसाठी तासनतास अभ्यास करतात. अभ्यास करण्याच्या नादात जेवण, पाणी पिण्याचे देखील भान राहत नाही. याकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष ठेवले पाहिजे. एकाच वेळी जास्त जेवू नये. अन्यथा पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. जास्त जेवल्यास मुलांना झोपही लागण्याची शक्यता असते.

 


Related News


12th Board Exam
10th December 2024

CBSE Board Exams:

12th Board Exam
5th December 2024

CBSE Board Exam 2025

12th Board Exam
21st November 2024

CBSE Date Sheet 2025 Out

12th Board Exam
18th September 2024

CBSE Board 2025 Exams

12th Board Exam
14th September 2024

CBSE Board Exams 2025

12th Board Exam
13th August 2024

SSC HSC Board Exam Date

12th Board Exam
25th May 2024

12th Supplementary Exam

12th Board Exam
5th May 2024

ICSE, ISC Result 2024

12th Board Exam
25th April 2024

JAC 12th Result 2024 Date

12th Board Exam
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

12th Board Exam
20th April 2024

UP Board Result 2024

12th Board Exam
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

12th Board Exam
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

12th Board Exam
18th April 2024

MPBSE Result 2024

12th Board Exam
17th April 2024

Gujarat Board Result 2024

12th Board Exam
13th April 2024

Haryana Board 2024

12th Board Exam
11th April 2024

MP Board Result 2024

12th Board Exam
8th April 2024

MP Board Result 2024

12th Board Exam
4th April 2024

UK Board Result 2024:

12th Board Exam
21st March 2024

5th to 11th board exams

12th Board Exam
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024