Engineering

Engineering

अभियांत्रिकी प्रवेशाची तिसरी व अंतिम फेरी २०१९

PUBLISH DATE 31st July 2019

राज्यातील शासकीय, स्वायत्त व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी तिसरी व अंतिम फेरीसाठी ३० ते ३१ जुलै या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन विकल्प नोंदवून ते कन्फर्म करायचे आहेत. या तिसऱ्या फेरीतून निश्चित झालेले प्रवेश २ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहेत. प्रत्यक्ष संस्थेत जाऊन प्रवेश ३ ते ५ ऑगस्ट पर्यंत असून, शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अभियांत्रिकी प्रवेशसाठी कट ऑफ डेट १४ ऑगस्ट आहे.

तिसऱ्या फेरीसाठी पात्र कोण ?

  • आजपर्यंत पहिल्या, दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला नाही असे सर्व विद्यार्थी.
  • यापूर्वी पहिल्या अथवा दुसऱ्या फेरीतच प्रवेश मिळाला व त्यांनी बेटरमेंट पर्याय निवडला असे सर्वजण.
  • यापूर्वी पहिलाच विकल्प प्राप्त झाला, म्हणजेच तो फ्रीज झाला किंवा ज्यांना मिळालेला प्रवेश आवडला, त्यांनी स्वतः तो फ्रीज केला असे विद्यार्थी या फेरीसाठी पात्र नाहीत.

विकल्प नोदाविताना

यापूर्वी प्रवेश मिळालेला आहे, त्यांनी तो स्वीकारून बेटरमेंट पर्याय निवडला आहे, त्यांना याफेरीमध्ये नव्याने विकल्प आपल्या आवडी नुसार नोदाविता येतात.

नोंदविलेल्या विकल्पामधून एखाद्या ठिकाणी बेटरमेंट घेऊ प्रवेश मिळाला तर पूर्वीचा प्रवेश आपोआप रद्द होतो. अशा वेळी नवीन मिळालेला प्रवेश घ्यावाच लागेल. विकल्प नव्याने मिळाला नाही तर मात्र पूर्वीचा विकल्प अंतिम असेल.

बीई/ बीफार्म कट ऑफ http://vidyarthimitra.org/rank_predictor

Check Previous Year & Current Year Cut-offs on http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

यापूर्वीच्या पहिल्या अथवा दुसर्या फेरीत भाग घेउनही कोणताच प्रवेश प्राप्त झाला नाही म्हणजेच ज्यांना चॉईस नॉट अव्हेलेबल असे आले आहे, त्यांनी मात्र या फेरीत गांभीर्याने विकल्प नोंदविणे आवश्यक आहे. मला हिच संस्था, हाच कोर्स पाहजे असा अट्टाहास न धराता या फेरीतून प्रवेश मिळवलाच पाहिजे. असा निश्चय करून भरपूर विकल्प नोंदविणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा शैक्षणिक शुल्क सवलत प्राप्त करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला राउंडच्यामाध्यमातूनच प्रवेश मिळवावा लागतो. एससी ,एसटी यांचे सर्व शैक्षणिक शुल्क माफ होते. उत्पन्नाची अट नाही. व्हीजे,एनटी, एनटी १, एनटी २, एनटी ३ यांचेही सर्व शैक्षणिक शुल्क माफ होते. तसेच ओबीसी, एसइबीसी , इडब्ल्यूएस  यांना ५० टक्के सवलत मिळते, परंतु त्यासाठी प्रवेश मात्र राउंड च्या माध्यमातून मिळवावास लागतो. संस्था पातळीवरील जागेवर प्रवेश घेतल्यावर शैक्षणिक सवलत मिळत नाही.

यापूर्वीच्या दोन्ही फेरीमध्ये काहीच मिळाले नव्हते, परंतु तिसऱ्या फेरीमध्ये प्रथमच प्रवेश मिळाला, त्यांनी प्रथम एआरसी म्हणजेच प्रवेश निश्चिती केंद्रावर हजर राहून येथील कार्यवाही पूर्ण केलेली, करावी व नंतरच संस्थेमध्ये प्रवेशासाठी जावे.

यापूर्वी प्रवेश मिळाला, बेटरमेंट दिली त्यांनी यापूर्वी एकदा एआरसी कार्यवाही पूर्ण केलेली आहे, त्यांना पुन्हा एआरसीमध्ये जाण्याची गरज नाही.

तिसऱ्या फेरीनंतर प्रवेश ज्या संस्थेत अंतिम झालेला आहे, त्या संस्थेत जाऊन शैक्षणिक शुल्क भरून तसेच सर्व मिल कागदपत्रे जमा करावी लागत असल्यामले त्यांच्या ज्यादा झेरोक्स प्रती कडून ठेवाव्यात. संस्थेकडे मुळ कागदपत्रे जमा केल्यानंतर त्यांचू रिसीट घ्यावी. याच पद्धतीने फार्मसी व आर्किटेक्चर यांचीही तिसरी अंतिम फेरी सध्या सुरु आहे.

बीई/ बीफार्म कट ऑफ http://vidyarthimitra.org/rank_predictor

Check Previous Year & Current Year Cut-offs on http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

11th Admissions (FYJC) Cut-off App https://goo.gl/rT2vXd

 http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)