Higher Education

Higher Education

फाईन आर्ट अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु

PUBLISH DATE 5th July 2021

पारंपारीक करीअरच्‍या पर्यायांच्या पलीकडे नवनवीन क्षीतीजे विद्यार्थ्यांसाठी खुली झाली आहेत.

कला शाखेत फाईन आर्ट व डिझाईनिंग (Fine Arts course)क्षेत्रातही करीअरच्‍या व्‍यापक संधी उपलब्‍ध आहेत. या शाखेशी निगडीत बॅचलर ऑफ फाईन आर्ट (Fine Arts course) आणि बॅचलर ऑफ डिझाईन या चार वर्ष कालावधीच्‍या पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना एचएएच-एएसी-सीईटी २०२१ (CET exam) परीक्षेसाठी २५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. (Online application can be filled till July 25 for the CET exam of Fine Arts course)

अन्‍य विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी घेतल्‍या जाणाऱ्या सीईटी परीक्षेपेक्षा फाईन आर्ट शिक्षणक्रमाची सीईटी वेगळी असणार आहे. सध्या बहुतांश सीईटी या ऑनलाइन स्‍वरूपात (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) आहेत. परंतु फाईन आर्टच्‍या सीईटीमध्ये प्रात्‍यक्षिक परीक्षा (प्रॅक्‍टिकल एक्‍झाम) चा समावेश आहे. पात्रता व अर्ज भरतांना घ्यावयाची काळजीसह अन्‍य तपशील सूचनापत्रातून जारी केला आहे. सीईटी सेलतर्फे ही सीईटी परीक्षा घेतली जाणार असून, परीक्षेतील कामगिरीच्‍या आधारे पुढील कॅप राउंड प्रक्रियेच्‍या माध्यमातून प्रवेश निश्‍चित केले जातील.

प्रात्‍यक्षिक परीक्षेवर अधिक भर

पेपर क्रमांक एक हा डिझाईन प्रॅक्‍टिकल विषयाशी निगडीत असेल. पेपर क्रमांक दोन हा ऑब्जेक्‍ट ड्रॉईंग प्रॅक्‍टिकल विषयाशी निगडीत असेल. पेपर क्रमांक तीन हा मेमरी ड्रॉईंगशी निगडीत असेल. पेपर क्रमांक चार हा सामान्‍य ज्ञानावर आधारीत असेल. प्रात्‍यक्षिक परीक्षेशी निगडीत पहिले तीन पेपरकरीता प्रत्‍येकी पन्नास गुण तर पेपर क्रमांक चार करीता चाळीस गुण असतील. वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी स्‍वरुपाचे प्रश्‍न विचारले जातील, चुकीच्‍या उत्तराकरीता गुण कपात नसेल.

तारखेच्‍या घोळाबाबत स्‍पष्टता आणावी

माहितीपत्रकात (इन्‍फॉरमेशन ब्राऊशर) नमूद केल्‍यानुसार अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ जुलैपर्यंत दिली आहे. तर पाचशे रुपये विलंब शुल्‍कासह अर्ज भरण्यासाठी २६ ते ३१ जुलै दरम्‍यानची मुदत दर्शविली आहे. प्रात्‍यक्षिक परीक्षेकरीता केंद्र निवडण्याची मुदत २५ जुलै ते १ ऑगस्‍ट अशी दाखविलेली आहे. मात्र अर्ज दाखल करण्यासाठी उपलब्‍ध लिंकला भेट दिल्‍यावर संकेतस्‍थळावरील तारखांमध्ये भिन्नता आहे. या संकेतस्‍थळावर अर्जाची मुदत २८ जुलैपर्यंत दाखविली आहे. विलंब शुल्‍कासह अर्जाची मुदत २९ जुलै ते ४ ऑगस्‍ट अशी दाखविली आहे. त्यामुळे तारखेच्‍या घोळाबाबत सीईटी सेलने स्‍पष्टता आणण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होते आहे.

Related News

फाईन आर्ट अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन अर्ज  प्रक्रिया सुरु
17th August 2024

UGC NET Admit Card 2024

फाईन आर्ट अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन अर्ज  प्रक्रिया सुरु
16th August 2024

GATE 2025 Brochure Released

फाईन आर्ट अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन अर्ज  प्रक्रिया सुरु
22nd June 2024

AIMA MAT 2024 August Exam

फाईन आर्ट अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन अर्ज  प्रक्रिया सुरु
19th March 2024

MHT CET 2024

फाईन आर्ट अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन अर्ज  प्रक्रिया सुरु
19th February 2024

NIFT Answer Key 2024

फाईन आर्ट अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन अर्ज  प्रक्रिया सुरु
15th February 2024

ATMA 2024 Admit Card Released

फाईन आर्ट अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन अर्ज  प्रक्रिया सुरु
18th January 2024

ICSI CSEET January 2024