Higher Education

Higher Education

आयआयटी डिझाइन पीजी आणि पीएचडी प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार २०२२

PUBLISH DATE 8th March 2022

आयआयटीमध्ये डिझाइन पीजी आणि पीएचडी प्रवेश परीक्षा सीईईडी २०२२ मध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology, IIT) मुंबईद्वारे आयोजित डिझाइन पीजी/पीएचडी प्रवेश परीक्षा- कॉमन एन्ट्र्न्स एक्झाम फॉर डिझाइन(Common Entrance Exam for Design, CEED) च्या निकाल ८ मार्च २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे.

CEED २०२२ चा निकाल आयआयटीची अधिकृत वेबसाइट ceed.iitb.ac.in वर जाहीर केला जाणार आहे. आयआयटी मुंबईतर्फे १२ मार्च रोजी परीक्षेच्या वेबसाइटवर CEED २०२१ स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी लिंक सक्रिय करण्यात येणार आहे.

मुंबईसह दिल्ली, बंगळुरू, गुवाहाटी, हैदराबाद, कानपूर, रुरकी येथील आयआयटी आणि IIITDM मधून चालविल्या जाणाऱ्या मास्टर ऑफ डिझाईन (M.Design) आणि PhD अभ्यासक्रम २०२२ मध्ये प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी CEED २०२२ घेतली जाते. यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. ही परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आली होती.

यानंतर संस्थेने २५ जानेवारी रोजी तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करून २७ जानेवारीपर्यंत उमेदवारांकडून हरकती मागवल्या होत्या. या आक्षेपांचा आढावा घेतल्यानंतर ३१ जानेवारी रोजी अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर, CEED २०२२ चा निकाल ८ मार्च रोजी जाहीर होणार होता.

१० मार्च रोजी UCEED २०२२ चा निकाल
दुसरीकडे, विविध आयआयटीमध्ये आयोजित केलेल्या डिझाईनमधील अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या UCEED २०२२ चा निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहे. या परीक्षांसाठी १६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज आले होते आणि ही परीक्षा २३ जानेवारीला झाली होती.

यानंतर तात्पुरती उत्तरतालिका २५ जानेवारीला आणि अंतिम उत्तरतालिका ३१ जानेवारीला जाहीर करण्यात आली. यूजी प्रवेश परीक्षेचे स्कोअरकार्ड १४ मार्चपासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहेत.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


आयआयटी डिझाइन पीजी आणि पीएचडी प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार २०२२
19th March 2024

MHT CET 2024

आयआयटी डिझाइन पीजी आणि पीएचडी प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार २०२२
19th February 2024

NIFT Answer Key 2024

आयआयटी डिझाइन पीजी आणि पीएचडी प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार २०२२
15th February 2024

ATMA 2024 Admit Card Released

आयआयटी डिझाइन पीजी आणि पीएचडी प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार २०२२
18th January 2024

ICSI CSEET January 2024