Higher Education

Higher Education

मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील पदवी प्रवेशांची दुसरी मेरिट लिस्ट जाहीर

PUBLISH DATE 12th August 2020

मुंबई विद्यापीठाअंतर्गत कॉलेजांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे.

या यादीनंतर अनेक नामांकित कॉलेजांमधील जागा दुसऱ्या गुणवत्ता यादीतच पूर्ण भरल्या आहेत. त्यामुळे अनेक कॉलेजांमधील विनाअनुदानित तुकड्यांसाठी तिसरी यादी जाहीर होणार नसल्याचे समजते. तर दुसऱ्या यादीतही काही कॉलेजांमध्ये कला शाखेत जागा शिल्लक नसल्याने गुणवत्ता यादी जाहीर न झाल्याचे समोर आले आहे.


यामुळे आता इतर कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवताना विद्यार्थ्यांना स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टला रोजी जाहीर होणाऱ्या तिसऱ्या गुणवत्ता यादीचे वेध लागले आहेत. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना काही कारणास्तव प्रवेश रद्द केल्यास वा तो न घेतल्यास अगदी काही मोजक्या जागांसाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे कॉलेज मिळाले नसेल, अशा विद्यार्थ्यांनी सध्या जेथे प्रवेश मिळाला तेथे प्रवेश घेऊन ठेवावा. यानंतर तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी प्रयत्न करावेत, असे जाणकारांनी सांगितले. अनेक विद्यार्थ्यांनी इनहाऊस कोट्यातून प्रवेश निश्चित केल्याने बाहेरील विद्यार्थ्यांसाठी जागा खूप कमी होत्या. मंगळवारी जाहीर झालेल्या यादीत बहुतांश कॉलेजांच्या जागा भरल्या असून, शक्यतो तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार नसल्याचे मत एका कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितले. याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांची तिसरी यादी निश्चित लागणार आहे, असा दिलासाही या प्राचार्यांनी दिला.

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सल्ला

यंदा इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षा पार पडलेल्या नाहीत. यामुळे इंजिनीअरिंग तसेच वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी पारंपारिक बीएससीसाठी प्रवेश घेतला आहे. जेव्हा इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्राची प्रवेश प्रक्रिया पार पडल त्यावेळस या जागा रिक्त होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजांत प्रवेश मिळालेला नाही. त्यांनी निराश न होता काही काळ प्रतीक्षा करावी, असा सल्लाही प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.