Higher Education

Higher Education

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया

PUBLISH DATE 27th December 2020

१८ जानेवारीपासून तासिका सुरू होणार, संकेतस्थळावर मिळेल प्रवेशाची माहिती

विद्यापीठात ऑनलाइन प्रवेश, ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून (२२ डिसेंबर) सुरू झाली. विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अाॅनलाइन नोंदणीची मुदत आहे.
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठातील सर्व ४५ विभाग, उस्मानाबाद उपकेंद्रातील १० विभागांत ‘ऑनलाइन’ प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या वर्षी ‘एमफिल प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने यशस्वीपणे राबवण्यात आली. २२ ते ३१ डिसेंबरदरम्यान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येईल. २ जानेवारीला प्राथमिक यादी तर ६ जानेवारीला पहिली यादी जाहीर हाेईल. १८ जानेवारीला दुसरी तर २३ जानेवारीला तिसरी यादी प्रसिद्ध होऊन स्पॉट अ‍ॅडमिशन देण्यात येणार आहे. पदव्युत्तर विभागाच्या तासिका १८ जानेवारीपासून सुरू होतील. विषय, उपलब्ध जागा, आरक्षण, शुल्क, पात्रता आदी सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमफिलची प्रवेश क्षमता पूर्ववत
यूजीसीच्या निर्देशांनुसार एमफिल अभ्यासक्रम आता बंद करण्यात आला आहे. पण डॉ. येवले यांनी यंदा शेवटच्या बॅचला मान्यता दिली आहे. मात्र त्यांनी प्राध्यापकांच्या संख्येनुसार एमफिलच्या जागांवर प्रवेश देण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे ३६० पैकी १६० जागा कमी झालेल्या होत्या. अनेक विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे यांनीही कुलगुरूंकडे जागा वाढवण्याची मागणी केली. त्यानंतर एक परिपत्रक जारी करून प्रत्येक अभ्यासक्रमाला २० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील, असे स्पष्ट केले.
एम.एस्सी.
पदार्थविज्ञान, प्राणिशास्त्र, इलेक्ट्रानिक्स, रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र, संख्याशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान.
एम.टेक. रसायन अभियांत्रिकी, बी.टेक. रसायन तंत्रज्ञान बी. व्होक./ एम.व्होक. - इंडस्ट्रियल ऑटोमेशन, ऑटोमोबाइल तंत्रज्ञान एमबीए, एमसीए, एमटीएम, मुद्रण तंत्रज्ञान, एलएलएम, एम.कॉम., एमआयबी, डीबीएम, एमएफए, एमएएमसीजे., एमएड, एमपीएड, एम.लिब. आदी.
पदव्युत्तर अभ्यासक्रम
एमए- मराठी, हिंदी, उर्दू, पाली व बुद्धिझम, संस्कृत, स्त्री अभ्यास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, इतिहास, भूगोल, विदेशी भाषा, मानसशास्त्र, अर्किऑलॉजी, फुले-आंबेडकर विचारधारा, योगशास्त्र, संगीत, बीपीए, आजीवन शिक्षण व विस्तार
या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

 

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.