Higher Education

Higher Education

पुणे विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे वर्ग सोमवार पासून सुरू होणार

PUBLISH DATE 13th February 2021

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वर्ग सोमवार पासून सुरू होणार आहेत; पण विद्यापीठात शिकणारे बहुतांश विद्यार्थी वसतिगृहात राहतात.

त्यामुळे त्यांच्या निवासाची व्यवस्था कशी करणार, हा प्रश्‍न कायम आहे. यावर शनिवारी (ता. १३) बैठक घेऊन नियमावली तयार करू असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

राज्य सरकारने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या वेळी सोशल डिस्टन्सिंग राहावे, ५० टक्के उपस्थिती असावी, सुरक्षेसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यांसह इतर सूचना केल्या आहेत. पुणे विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना सुमारे ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी, विद्यार्थिनी वसतीगृहात राहातात. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिलेल्या सुधारित नियमावलीमध्ये वसतिगृहातील खोली विद्यार्थ्यांना शेअरिंग करता येणार नाही, असे स्पष्ट नमूद केले आहे. 

पुणे विद्यापीठात विविध प्रकारच्या खोल्या आहेत. त्यामध्ये काहींमध्ये एक विद्यार्थी राहण्याची सोय आहे. तर काहींमध्ये दोन, तीन, चार आणि आठ जण राहू शकतील, अशा एकूण १ हजार २३६ खोल्या आहेत. त्यामुळे ‘यूजीसी’च्या नियमांचे कडक पालन केल्यास विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करणे अवघड आहे. 

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, ‘‘सोमवारपासून विद्यापीठात ज्ञानदान सुरू होईल. वसतीगृहामध्ये किती विद्यार्थी राहणार, त्यांची सोय कशी करणार याबाबत शासनाचे आदेश लक्षात घेऊन नियम तयार केले जातील. शनिवारी याबाबत बैठक घेऊन सविस्तर परिपत्रक काढले जाईल. 

विद्यार्थी 
वसतीगृह - ९ 
खोल्या - ७२१ 
क्षमता- २०१९ 

विद्यार्थिनी 
वसतीगृह - ९ 
खोल्या - ५१५ 
क्षमता- १४६५ 

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.