b pharmacy admission 2024-25 maharashtra: २६ पर्यंत प्रशासकीय पातळीवर अर्जांची तपासणी. २८ सप्टेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना यादीवर आक्षेप नोंदविता येतील तर ४ ऑक्टोबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. बीफार्मसीसह एमफार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रक्रियेतही विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
Maharashtra B Pharmacy Admission 2024
Pharmacy admission 2024 in maharashtra : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) औषधनिर्माणशास्त्र पदवी(बी.फार्मसी), पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या (एम.फार्मसी) प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. सुधारित वेळापत्रकानुसार २५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत.
राज्यातील औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. जुलै-ऑगस्टपासून सुरु असलेली अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. प्रवेश अर्ज भरण्याची मुदत बुधवारी संपली होती. पुन्हा या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. बीफार्मसी प्रवेशासाठी सुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेत ७ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
२६ पर्यंत प्रशासकीय पातळीवर अर्जांची तपासणी. २८ सप्टेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना यादीवर आक्षेप नोंदविता येतील तर ४ ऑक्टोबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. बीफार्मसीसह एमफार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रक्रियेतही विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
'कृषी'चे प्रवेशही सुरू-
राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील दहा विद्याशाखांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने प्रक्रियेचे गुरुवारी वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज, कागदपत्र अपलोड करण्याची मुदत देण्यात आली आहे.
परिषदेने कृषी विद्यापीठांतर्गत २०२४-२५ प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले. राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ-राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ-अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ-परभणी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ-दापोली अंतर्गत ४१ महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश दिले जातात. यामध्ये ३३ शासकीय तर आठ अनुदानित महाविद्यालये आहेत. यामध्ये प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता १३८८ आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्यासोबतच आवश्यक ती स्कॅन केलेली कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करावयाची आहेत. वेळापत्रक, माहिती पुस्तिका कृषी परिषदेच्या www.mcaer.org या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सर्व आवश्यक कागदपत्रांसह काळजीपूर्वक भरावेत व विचारपूर्वक अधिकाधिक प्राधान्यक्रम द्यावेत असे आवाहन परिषदेचे संचालक हरिहर कौसडीकर यांनी केले आहे.
------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |
We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा
NEET UG Round 2 Seat Allotment Results 2024
NEET MDS 2024 qualifying cut-off percentile
AYUSH NEET UG 2024 Counselling: Round 2 Registration Window Opens
MCC NEET PG Counselling 2024 Date To Be Out Soon
AYUSH NEET UG Counselling 2024
NEET UG Counselling 2021: Round 2 Registration To Commence Today