Higher Education

Higher Education

‘पेट’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

PUBLISH DATE 31st December 2020

पीएचडी पूर्वपरीक्षा “पेट’साठीची नोंदणी प्रकिया १ जानेवारीपासून सुरू हाेणार अाहे. नोंदणीसह परीक्षादेखील ऑनलाइन घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देता येईल असे नियोजन विद्यापीठाने केले आहे, अशी माहिती बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
डॉ. येवले म्हणाले की, एकूण ४२ विषयांमध्ये पेट परीक्षा घेण्यात येईल. पेटची मुदत एक वर्षासाठी असेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. प्राध्यापकांचे प्रशिक्षण, संशोधन, पीएचडी व्हायवासाठीदेखील ऑनलाइन पद्धत वापरली. यास चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढे नियमित ऑनलाइन व्हायवा घेण्याचा विचार सुरू अाहे. अचानक लॉकडाऊन लागल्याने ग्रामीण भागातून विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची अडचणी होऊ नये यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यापीठ प्रशासनाने त्यांना मदत केली. तसेच गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांना मदत करत आपली सामाजिक बांधिलकी जपली.
काटकसरीमुळे विद्यापीठाचे ७ काेटी वाचले : मागील वर्षी विद्यापीठाने फाइल ट्रॅकिंग पद्धत सुरू केली होती. आता पोलिस आयुक्तांनी याचा डेमो दाखवा, आम्हीदेखील या पद्धतीचा अवलंब करू इच्छित असल्याचे सांगितले अाहे. यंदा एकूण ११३ परदेशी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश नोंदणी केली आहे. काटकसरीमुळे विद्यापीठाची ७ काेटी रुपयांची बचत झाली अाहे. विद्यापीठांनी आता काॅर्पाेरेट पद्धतीने कामकाज केले पाहिजे, असे डॉ. येवले म्हणाले. पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

असे आहे परीक्षेचे वेळापत्रक
पार्ट १ आणि पार्ट २ अशा दोन पद्धतींनी पेट घेण्यात येईल. १ ते ११ जानेवारीदरम्यान शुल्क भरून अाॅनलाइन अर्ज नोंदणी करावी. २१ जानेवारी रोजी ऑनलाइन अॅडमिट कार्ड विद्यार्थ्यांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध होईल. ३० जानेवारीला पार्ट वन आॅनलाइन पेपर होईल. तर १ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येईल. पार्ट टूसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी ६ फेब्रुवारीला जाहीर होईल. पार्ट टू पेपरसाठी १३ फेब्रुवारी रोजी अॅडमिट कार्ड उपलब्ध होईल.२१ फेब्रुवारी रोजी परीक्षा होईल. २४ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होऊन दोन पेपरचा अंतिम निकाल २८ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येईल. पेट उत्तीर्ण झालेल्यांना १ मार्चपासून ऑनलाइन पीएचडीसाठी नोंदणी करता येईल. अंतिम तारीख १५ मार्च असेल. आरआरसी मीटिंग एप्रिल महिन्यात होईल.

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.