Higher Education

Higher Education

Nursing Career Courses

PUBLISH DATE 12th June 2025

Top Nursing Courses In India: विज्ञान शाखेतून करिअरच्या अनेक वाटा खुल्या होतात, त्यापैकीच एक म्हणजे नर्सिंग. वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्वाचे क्षेत्र म्हणून याकडे पाहिले जाते. तरुण मुला-मुलींसाठी रोजगाराचे आणि उत्तम पगाराचे मोठ साधन म्हणून ‘नर्सिंग’ कोर्सकडे पाहिले जाते.

अनेकांना नर्सिंग म्हणजे केवळ मुलीच हा कोर्स करू शकतात, असा समज आहे. पण, हा कोर्स मुली- मुले दोघांसाठीही आहे. कला किंवा वाणिज्य शाखेतील विद्यार्थी नर्सिंग करू शकतात. त्यांना ‘एएनएम’ करून नर्सिंग क्षेत्रात येता येते.

आरोग्य क्षेत्रात डॉक्टरांइतकेच महत्व परिचर किंवा परिचारिकांना असते. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केली असेल किंवा बीएस्सी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी करिअर म्हणून या क्षेत्राचा विचार करू शकतात.

रुग्णांवर प्राथमिक उपचार करणे, इंजेक्शन, औषधे देणे, ड्रेसिंग, फिजिओथेरपी, डॉक्टरांच्या अनुपस्थितीत रुग्णाची काळजी घेणे, अशी अनेक कामे नर्सिंगमध्ये येतात. सध्या त्यांच्या कामात अनेक बदल झाले असून वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नवीन गोष्टी त्यांना शिकवल्या जात आहेत.

परिचारिका किंवा परिचर बनण्याची इच्छा असल्यास त्यामध्ये प्रामुख्याने तीन कोर्सेस आहेत. ज्यामध्ये एएनएम, जीएनएम आणि बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. नर्सिंग हा अभ्यासक्रम अनेक सरकारी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असल्याने त्याचा शिक्षणाचा खर्च हा प्रत्येक संस्थेवर अवलंबून आहे.

सरकारी महाविद्यालये आणि सरकारी अनुदानित महाविद्यालये यामध्ये खासगी संस्थांपेक्षा तुलनेने अत्यंत माफक शुल्क आकारले जाते. परंतु, खासगी वैद्यकीय शिक्षण संस्था अंदाजे ४० हजार ते १ लाख ८० हजारपर्यंत वार्षिक शुल्क आकारतात.

नर्सिंगमध्ये ‘हे’ तीन कोर्स...

1. एएनएम( ANM Course )

ऑक्झिलरी नर्स मिडवाइफ/हेल्थ वर्कर कोर्स. जो नर्सिंगचा डिप्लोमा म्हणून ओळखला जातो. या पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी दीड ते दोन वर्षांचा असून हा बारावी नंतर करता येऊ शकतो.

2. जीएनएम (GNM Course)

जनरल नर्स मिडवाइफरी हा कोर्स साडेतीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषय घेऊन विज्ञान शाखेतून बारावी परीक्षा किमान ४० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3. बीएससी नर्सिंग (B.Sc. Nursing)

यामध्ये नर्सिंग क्षेत्रातील पदवी तुम्हाला प्राप्त होते. हा चार वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयासह विज्ञान शाखेतून किमान ४५ टक्क्यांनी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

अशा आहेत नोकरीच्या संधी

सध्याचे वातावरण आणि रोगराईचे प्रमाण पाहता या क्षेत्रात प्रचंड मोठ्या संधी आहे. करोना काळात या सगळ्याचे महत्व आपण जाणलेच. त्यामुळे नर्सिंग हे अनेक मोठ्या संधींनी भरलेले क्षेत्र आहे. ज्यामध्ये सरकारी, निमसरकारी किंवा खासगी रुग्णालये, नर्सिंग होम यामध्ये नोकरी करू शकता.

याशिवाय सरकारी आस्थापना, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आरोग्य गृह अशा ठिकाणीही परिचर आणि परिचारिका यांना उत्तम संधी असते. सध्या या क्षेत्रात वेतनही भरपूर दिले जात आहे. एवढेच नव्हे तर परदेशातही संधी उपलब्ध आहेत.

 

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Government Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send a WhatsApp message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.


Related News


Nursing Career Courses
3rd July 2025

Maharashtra CET Exam

Nursing Career Courses
30th June 2025

Best Engineering colleges

Nursing Career Courses
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

Nursing Career Courses
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

Nursing Career Courses
26th June 2025

DVET ITI admission 2025

Nursing Career Courses
25th June 2025

IAT 2025 Result announced

Nursing Career Courses
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

Nursing Career Courses
23rd June 2025

Acupuncture Courses

Nursing Career Courses
21st June 2025

QS World Rankings 2025

Nursing Career Courses
21st June 2025

NEET UG 2025 Result

Nursing Career Courses
21st June 2025

LLB 3 Years CET Result

Nursing Career Courses
18th June 2025

JoSAA Counselling 2025

Nursing Career Courses
17th June 2025

JoSAA Counselling 2025

Nursing Career Courses
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

Nursing Career Courses
14th June 2025

Foreign Scholarship

Nursing Career Courses
13th June 2025

Pharmacy admission 2025

Nursing Career Courses
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

Nursing Career Courses
23rd May 2025

NAAC Accreditation

Nursing Career Courses
22nd May 2025

Petroleum Engineering

Nursing Career Courses
20th May 2025

BMS admissions 2025

Nursing Career Courses
17th May 2025

ITI Courses For Girls