Higher Education

Higher Education

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स

PUBLISH DATE 16th August 2021

माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शालांत परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. शाळा-महाविद्यालयात नियमित न जाताही विद्यार्थ्यांना ७० ते ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहेत.

त्यामुळे प्रत्येक पालक तसेच पाल्य भविष्यातील विविध व्यवसायांचा विचार करताना त्यांच्यासमोर इयत्ता अकरावी (कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखा), औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तांत्रिक अभ्यासक्रम (आय.टी.आय) आणि तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजित प्रथम वर्ष पोस्ट एसएससी दहावीनंतरचे पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.

० इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची नोंदणी सुरू झालेली आहे.

० शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तीन वर्ष कालावधीच्या पूर्णवेळ पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम राबवणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. ऑनलाइन प्रवेश नोंदणी आणि इतर माहिती या पोर्टलवरून घ्यावी http://www.dtemaharashtra.gov.in प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट आहे.

० राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक खासगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये २१ ऑगस्टपर्यंत रोज सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सर्व सुट्टीच्या दिवशीदेखील मार्गदर्शन सत्र व प्रवेश प्रक्रिया संबंधी कार्यवाही सुरू राहील. http://admission.dvet.gov.in आयटीआय प्रवेश पोर्टलवरून अधिक माहिती घ्यावी. ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्ज दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यानंतर प्रवेश शुल्क जमा करणे इत्यादीसाठी अंतिम दि. ३१ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.

० कोणतेही व्होकेशनल अभ्यासक्रम उदा. लेदर वर्क्स, शिलाई मशीन ऑपरेटर, गारमेंट टेक्नॉलॉजिस्ट, ब्युटी अँड वेलनेस, इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर, जेम्स अँड ज्वेलरी, स्पोर्ट्स आणि फिटनेस, ट्रॅव्हल एजंट, ड्रायव्हिंग, क्राफ्ट बेकरी, टूरिस्ट गाइड, हँड अॅम्ब्रोयडरी, मशीन अॅम्ब्रोयडरी, स्पिनिंग मिल ऑपरेटर, पेंटर, प्लम्बर, गवंडीकाम, कार्पेंटर, काँक्रीट मोल्डर, प्रिंटर टेक्निशियन, रेडिओ आणि टीव्ही टेक्निशियन, मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर, रेफ्रिजरेशन टेक्निशियन, सीसीटीव्ही इन्स्टॉलर, सेट टॉप बॉक्स आणि टेक्निशियन, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, लायब्ररी असिस्टंट, नर्सरी टीचर, सेल्स एक्झिक्युटिव्ह इत्यादी व यापेक्षाही अनेक प्रकारचे इतर कमी वेळेत शिकण्याचे अभ्यासक्रम.

वरीलपैकी कोणत्याही प्रोफेशनल तथा व्होकेशनल अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा.

० स्वतःच्या क्षमता ओळखा. अभ्यासक्रम स्वतःच्या पसंतीने निवडा.

० मित्र अथवा मैत्रिणीने निवडलेला अभ्यासक्रम हा त्याच्या किंवा तिच्या पसंतीचा असतो. त्यांची पसंती ही स्वतःची समजू नका.

० अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी विचारात घेऊन त्यानुसार पुढील नियोजन करा.

० कोणताही अभ्यासक्रम निवडल्यास प्रत्येक ठिकाणी सातत्यपूर्ण अभ्यास आहे हे लक्षात ठेवा.

० व्यावसायिक अभ्यासक्रम निवडताना स्वतःच्या कामातील गती आणि अचूकता याचा अंदाज घ्या.

० स्वतःच्या भाषिक क्षमतांचा विकास करण्याच्या दृष्टीने सदैव प्रयत्नशील राहा.

० गणितीय क्षमता जास्तीत जास्त वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करा.

० तुम्हाला गणित व विज्ञानात विशेष अभिरुची, सर्व संकल्पना समजण्याइतकी आकलन क्षमता असल्यास आणि भविष्यात त्याच विषयात विशेष अभ्यास करण्याची आवड असल्यास तुम्ही पदविका तसेच पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता. कारण शालेय स्तरावर तुम्ही गणित आणि विज्ञान यांचा प्राथमिक अभ्यास केलेला असतो. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर इंजिनीअरिंग मॅथेमॅटिक्स, अप्लाइड फिजिक्स, अप्लाइड केमिस्ट्री, व्हॅल्यू अँड एथिक्स इन टेक्निकल एज्युकेशन इत्यादींसारख्या उपयोजनांवर आधारित असलेल्या विषयांचा अभ्यास करावा लागतो. कारण हे विषय शाळेतील विषयांपेक्षा पूर्णतः वेगळे असतात.

योग्य विचार करूनच आपल्या अभ्यासक्रमाची निवड करा.

सुदाम कुंभार
(लेखक निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक आहेत.)

Related News

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
1st August 2025

Law Admission Schedule 2025

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
28th July 2025

DU UG Admission 2025

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
28th July 2025

CAT 2025 Notification

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
22nd July 2025

CCSU BBA, BCA June 2025

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
21st July 2025

DU UG 2025 Admissions

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
16th July 2026

DU UG Admissions 2025

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
16th July 2025

AIIMS CRE 2025

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
9th July 2025

BSc Nursing Admission

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
7th July 2025

Archives to Algorithms

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
5th July 2025

CUET UG 2025 Result

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
3rd July 2025

Maharashtra CET Exam

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
30th June 2025

Best Engineering colleges

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेश घेण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
28th June 2025

CUET UG Result 2025 Date