Higher Education

Higher Education

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम

PUBLISH DATE 24th June 2025

जागतिक पातळीवरच्या एआयशी सबंधित असलेल्या सर्वोत्तम अभ्यासक्रमांची/प्रमाणपत्रांची ओळख आज आपण करून घेऊ. ज्यांना एआयच्या क्षेत्रात येण्यासाठी खूप प्रयत्न करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी जे लोक खूप जास्त खर्च करण्याची तयारीसुद्धा दाखवतात अशांसाठीच्या पर्यायांचा इथे प्रामुख्यानं विचार केला आहे. एआयशी संबंधित असलेले विषय शिकण्यासाठी हे करण्याची गरज नसल्याचं आपण आधी नमूद केलेलंचं आहे. त्याची पुनरावृत्ती न करता एआयमधले विषय शिकण्यासाठी पुस्तकं, यूट्यूब, इंटरनटवरचे लेख आणि युडेमीवरचे अभ्यासक्रम एवढा ऐवज तसा पुरेसा आहे. हवं तर आपण आजच्या मुद्दयांचं वर्णन ‘एआयसाठीचे पुढच्या पातळीवरचे अभ्यासक्रम/प्रमाणपत्रं’ असं करू.

स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाद्वारे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्रॅज्युएट सर्टिफिकेट’ नावाचा अभ्यासक्रम इंटरनेटवर चालवला जातो. यात मशीन लर्निंग आणि एआय यांच्यामधला एक विषय निवडायचा असतो. त्यानंतर डीप लर्निंग, डेटा मायनिंग, रोबॉट, रीएनफोर्समेंट लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रॉसेसिंग अशा अनेक विषयांपैकी तीन विषय निवडायचे असतात. हा अभ्यासक्रम १-२ वर्षांमध्ये पूर्ण व्हावा अशी अपेक्षा असते. यासाठीची फी २०-२४ हजार अमेरिकी डॉलर्स एवढी असते. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी एआयच्या विश्वातले जगप्रसिद्ध तज्ज्ञ अँड्रयू एनजी यांच्यासह काही विलक्षण कुवतीचे प्राध्यापक असतात.

एमआयटीतर्फे ‘प्रोफेशनल सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन मशीन लर्निंग अॅण्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘ नावाचा अभ्यासक्रम फक्त १६ दिवसांचा असतो. यात अनेक विषय २-३ दिवसांमध्ये शिकवून हा अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. उदाहरणार्थ मशीन लर्निंगशी संबंधित असलेले दोन अभ्यासक्रम अनुक्रमे २ आणि ३दिवसांत पूर्ण करतात. कुणाला एवढ्यावरच थांबायचं असेल तर थांबता येतं. अशा प्रत्येक छोट्या विषयाच्या अभ्यासक्रमाची किंमत सुमारे २,५००-३,५०० डॉलर्स असते. एआयशी संबंधित असलेल्या इतर सगळ्या विषयांचेही असेच छोटे अभ्यासक्रम असतात. त्यामधले ठरावीक प्रमाणातले पर्याय निवडून हा १६ दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो.

कोर्सेरा या वेबसाइटवर एआयशी संबंधित असलेले बरेच अभ्यासक्रम आहेत. त्यापैकी आयबीएम कंपनीनं तयार केलेला ‘इन्ट्रॉडक्शन टू एआय’ आणि डीपलर्निंग डॉट एआय या संस्थेचा ‘एआय फॉर एव्हरीवन’ हे दोन अभ्यासक्रम विशेष नावाजलेले आहेत. साधारण १-४ आठवड्यांच्या काळात हे पूर्ण करण्याची अट असते. हे दोन्ही अभ्यासक्रम अगदी सोप्या पातळीचे आहेत. ते विनामूल्य पूर्ण करता येतात. त्यांच्यामध्ये एआयविषयीची प्राथमिक माहिती देण्यात येते. अर्थात या वेबसाइटवर एआयशी संबंधित असलेले अक्षरश: डझनावारी अभ्यासक्रम आहेत. त्यांची यादी इथे देणं अशक्य असलं तरी एआयशी संबंधित असलेल्या जवळपास प्रत्येक पैलूशी संबंधित असलेले अभ्यासक्रम आपल्याला इथे आढळतील. जरा खोलवरच्या अभ्यासक्रमांची फी साधारण १०,००० रुपयांच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकते.

कोर्सेराची एक अट जरा जाचक ठरू शकते. इथले अभ्यासक्रम आपण आपल्या वेगानं पूर्ण करू शकत नाही. साधारण दीड-दोन महिन्यांच्या कालावधीत जर आपण हे अभ्यासक्रम पूर्ण केले नाहीत तर आपली फी तर जातेच; पण तो अभ्यासक्रमही आपण पूर्ण करू शकत नाही. अर्थातच ज्यांनी या अभ्यासक्रमांना आपलं नाव नोंदवलं आहे त्यांनी पूर्ण गांभीर्यानं हे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करावेत असा यामागचा उद्देश असला तरी काही जणांना मात्र हे जाचक ठरू शकतं. अशी अट युडेमीच्या वेबसाइटवर नसते आणि तिथल्या अभ्यासक्रमांची फीसुद्धा तुलनेनं बरीच कमी असते.

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोर्ड ऑफ अमेरिका (अर्टिबा)’ नावाची संस्था एआयशी संबंधित असलेली प्रमाणपत्रं देते. यासाठी एक परीक्षा घेतली जाते. ती उत्तीर्ण होणारा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनीअर (एआयइ)’ म्हणून ओळखला जातो. या संस्थेचे तीन अभ्यासक्रम आहेत. आपल्या शैक्षणिक पातळीनुसार त्यामधल्या एका अभ्यासक्रमाची निवड करायची असते. त्यानुसार संबंधित प्रमाणपत्र परीक्षेमधल्या निकालानुसार मिळतं. परीक्षेमध्ये ९० मिनिटांमध्ये ६० बहुविध पर्यायांच्या प्रश्नांमधले अचूक पर्याय निवडायचे असतात. अभ्यासासाठी या संस्थेकडून पुस्तकं मिळतात. त्यातून अभ्यास करायचा असतो. या सगळ्यासाठी ही संस्था ५५० डॉलर्सची फी आकारते. हा अभ्यासक्रम नसून आपण एआयच्या क्षेत्रात काम करण्यासाठी तयार असल्याची अधिकृत पावती असल्यासारखी असते.

हे सगळे पर्याय जास्त खर्चिक आणि ज्यांना एआयमध्ये काहीही करून शिरायचंच आहे त्यांच्यासाठी आहेत, हे पुन्हा एकदा सरतेशेवटी नमूद करतो. साहजिकच खूप विचार करून मगच त्यांचा विचार करावा. इतर सगळ्यांना एआयमधले सगळे बारकावे शिकण्यासाठी कमी खर्चिक पर्याय आहेतच!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Government Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send a WhatsApp message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.

 


Related News


कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
23rd June 2025

Acupuncture Courses

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
21st June 2025

QS World Rankings 2025

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
21st June 2025

NEET UG 2025 Result

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
21st June 2025

LLB 3 Years CET Result

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
18th June 2025

JoSAA Counselling 2025

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
17th June 2025

JoSAA Counselling 2025

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
14th June 2025

Foreign Scholarship

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
13th June 2025

Pharmacy admission 2025

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
12th June 2025

Nursing Career Courses

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
23rd May 2025

NAAC Accreditation

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
22nd May 2025

Petroleum Engineering

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
20th May 2025

BMS admissions 2025

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
17th May 2025

ITI Courses For Girls

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
30th April 2025

VITEEE 2025 Result

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
23rd April 2025

Mumbai University Admission

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
19th April 2025

SRMJEEE 2025

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
18th April 2025

VITEEE 2025 Admit Cards

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
8th April 2025

NEET MDS 2025

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
21st March 2025

KVS Admission 2025

कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात, जागतिक पातळीवरील एआय अभ्यासक्रम
24th February 2025

BAMU Result 2025 Declared