Abroad Education

Abroad Education

परदेश शिष्यवृत्ती : निकषांमध्ये बदल

PUBLISH DATE 28th July 2024

परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी 'बार्टी', 'सारथी', 'महाज्योती', 'टीआरटीआय' आदी संस्था व संबंधित विभागाच्या विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार अधिछात्रवृत्ती व परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने जारी केला आहे.

परदेश शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग, नियोजन विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग या विभागांमार्फत स्वतंत्रपणे राबविण्यात येते. या सर्व विभागांच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेत एकवाक्यता येण्यासाठी ३० ऑक्टोबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयापूर्वी 'बार्टी' (प्राप्त अर्ज ७६३), 'सारथी' (प्राप्त अर्ज एक हजार ३२९), 'महाज्योती' (प्राप्त अर्ज एक हजार ४५३) या संस्थांमार्फत देण्यात आलेल्या अधिछात्रवृत्ती जाहिरातींनुसार आलेल्या अर्जामधील कागदपत्रांची पडताळणी करून व शपथपत्र घेऊन एकूण तीन हजार ५४५ संशोधक विद्यार्थ्यांपैकी पात्र संशोधक विद्यार्थ्यांना ५० टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती मंजूर करण्यास मान्यता देण्यात येणार आहे.

अधिछात्रवृत्तीसाठी बदल:

  • 'बार्टी', 'सारथी', 'महाज्योती' या संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी निश्चित मर्यादा २०० वरून ३०० करण्यात आली आहे.

  • आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी मर्यादा १०० वरून २०० करण्यात आली आहे.

  • परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५ टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

  • पीएच. डी. साठी विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

  • शैक्षणिक शुल्क थेट संबंधित शैक्षणिक संस्थेस दिले जाणार आहे.

आदिवासी विकास विभागातील परदेश शिष्यवृत्ती योजना:

  • विहित निकषानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास कुटुंबाच्या उत्पन्नाची वार्षिक मर्यादा व 'क्यूएस वर्ल्ड रॅकिंग'ची मर्यादा शिथिल करून विद्यार्थ्यांस परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येईल. तथापि, हा लाभ देताना उत्पन्नाची वार्षिक मर्यादा आठ लाखांपासून जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत शिथिल करण्यात येणार आहे, असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा