Higher Education

Higher Education

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेची स्थापना

PUBLISH DATE 2nd March 2020

 

स्वायत्ततेसाठी कंपनी कायद्याखाली स्थापना

शैक्षणिक पद्धतींमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती कॉलेजांमधील अध्यापक आणि प्राचार्यांना होण्यासाठी, त्यांना अद्ययावत प्रशिक्षण देणाऱ्या अध्यापक प्रशिक्षण संस्थेची पुण्यात स्थापना करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या संस्थेला स्वायत्तता मिळण्याच्या अनुषंगाने कंपनी कायद्याखाली संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीतील बदल लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागातील कॉलेजांमधील अध्यापक व प्राचार्यांच्या प्रशिक्षणासाठी कंपनी कायद्यान्वये अध्यापक विकास संस्था स्थापन करण्याबाबतची माहिती काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिली होती. त्यावर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. याबाबतचा शासन निर्णय २४ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आला. या प्रशिक्षण संस्थेत राज्य सरकारचा सहभाग ४० टक्के, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा हिस्सा पाच टक्के, राज्यातील सर्व विद्यापीठांचा हिस्सा ४० टक्के, शैक्षणिक संस्था व उद्योग यांचा हिस्सा पाच टक्के; तसेच स्वयंसेवी संस्था व व्यवसाय संस्था यांचा हिस्सा १० टक्के एवढा राहील. प्रशिक्षण संस्थेचा कारभार सुरळीत चालावा यासाठी विद्यापीठे; तसेच कॉलेजे, संस्था यांच्याकडून सदस्यत्वशुल्क घेण्यात येणार आहे. याशिवाय 'कॉर्पोरेट' व 'बिझनेस हाऊस' यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा 'कॉर्पस फंड' तयार करण्यात येईल. या प्रशिक्षण संस्थेचे कामकाज चालवण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येणार असून, मुख्य सचिव हे त्याचे अध्यक्ष असतील. या संस्थेमध्ये अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान, नेतृत्व विकास, बहुअनुशासनात्मक अध्यापक समूह व सर्वसमावेशक शिक्षण अशी पाच उत्कृष्टता केंद्रे प्रस्तावित आहेत. प्रशिक्षण देण्यासोबतच दुर्बल घटक, महिला व दिव्यांग यांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने संवेदशीलता निर्माण करण्याचाही उद्देश आहे. यासोबतच पायाभूत आणि नियतकालिक प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील कॉलेजांमध्ये सुमारे ५५ हजार अध्यापक कार्यरत आहेत. या सर्वांना 'रोटेशन' पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येईल, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

संस्थेची उद्दिष्टे

- अध्यापक, प्राचार्य यांना उद्योग व त्यांच्या संबंधित क्षेत्राचे अद्ययावत ज्ञान देण्यासोबतच शैक्षणिक पद्धत आणि तंत्रज्ञानाने समृद्ध करणे.

- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये झालेल्या बदलांच्या आधारे प्रशिक्षण पद्धतीमध्ये गरजेनुरूप बदल करणे.

- रोजगार संधीच्या आधारे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम विकसित करून, तसे बदल अभ्यासक्रमामध्ये करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन करणे.

- प्रभावी शिकणे-शिकविण्याची पद्धती निर्माण करणे व शैक्षणिक क्षेत्रामध्ये संशोधनास प्रोत्साहित करणे.

- शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रांमधील शैक्षणिक पद्धतींचा अभ्यास करून अद्ययावत तंत्रज्ञानाधिष्ठित व रोजगाराभिमूख अभ्यास पद्धतींची सरकारला शिफारस करणे.

.Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020