Higher Education

Higher Education

मास्टर इन काॅमप्युटर अप्लिकेशन ही तीन वर्षाची पदव्युत्तर पदवी आता दोन वर्षांची असणार

PUBLISH DATE 25th May 2020

मास्टर इन काॅमप्युटर अप्लिकेशन (एमसीए) ही तीन वर्षाची पदव्युत्तर पदवी आता दोन वर्षांची असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचणार अाहे. 

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला महत्व प्राप्त होत असल्याने पदवी शिक्षणानंतर 'एमसीए'ची पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करतात. साधारणतः बहुतांश पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम हा दोन वर्षांचा असतो, पण 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थे'च्या (आयएसटीई) नियमावली नुसार 'एमसीए' ही पदव्युत्तर पदवी तीन वर्षांचा करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक वर्ष जास्त जात होते. तसेच 
बीएससी काॅमप्युटर किंवा बीबीए ही पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 'एमसीए'च्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश (लॅटरल एंट्री) दिला जात होता. 

दरम्यान, प्रथम वर्षाला बी. काॅम किंवा इतर पदवीधर प्रवेश घेतला होते. त्यामुळे 'एमसीए'च्या पहिल्या वर्षाला नाममात्र प्रवेश होत असल्याने प्राध्यापकांचा पगार व इतर खर्च होत होता. त्यामुळे 'एआयसीटीई'ने 'एमसीए'च्या नियमात बदल करावे अशी मागणी अखिल भारतीय पातळीवर होत होती. त्यानुसार जानेवरी महिन्यात 'एआयसीटीई'ने 'एमसीए'ला दोन वर्षांचा अभ्यासक्रम म्हणून मान्यता दिली. 

"राज्यात सर्वाधिक पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत 'एमसीए'चे शिक्षण देणाऱ्या २८ संस्था असून, यात सुमारे ३ हजार ५००  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 'एआयसीटीई'च्या आदेशानुसार 
'एमसीए'ची पदवी दोन वर्षाची करण्याचा प्रस्ताव विद्या परिषदेच्या बैठकीत ठेवला होता, त्यास मान्यता मिळाली. त्यामुळे यंदाच्या वर्षी पासून या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण वाढेल," असे पुणे विद्यापीठाच्या काॅमप्युटर मॅनेजमेंट अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. अमोल गोजे यांनी सांगितले. 

५० टक्के प्रॅक्टीकल नाॅलेज
'एमसीए'चा ५० टक्के अभ्यासक्रम थेअरी तर ५० टक्के प्रॅक्टीकल असा असेल. २५ टक्के भाग आॅनलाईन शिक्षणाचा असेल. सध्या इंडस्ट्रीमध्ये नवीन ट्रेंड असताना विद्यार्थ्यांनाही त्यादृष्टीने तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, जावा, ओरॅकल हे सर्टीफाईड कोर्सही असणार आहेत, असे गोजे यांनी सांगितले. 

नियम बदलाचे फायदे

  1.  विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे एक वर्ष कमी झाले
  2.  लॅटरल एंट्री बंद झाल्याने संस्थांचा खर्च कमी 
  3.  एमबीए, एमएससी एेवजी एमसीएकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल
  4.  नवीन ट्रेंड विद्यार्थ्यांना शिकता येणार

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)