MBA Admissions 2020-21

MBA Admissions 2020-21

‘एमबीए २०१९’ प्रवेश प्रक्रियेला स्थगिती

PUBLISH DATE 27th July 2019

मुंबई उच्च न्यायालयाने जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (जेबीआयएमएस) संस्थेतील एमबीएचे प्रवेश रद्दबातल ठरवून, चार आठवड्यांच्या आत राज्यस्तरीय गुणवत्तेप्रमाणे एमबीएची प्रवेशप्रक्रिया नव्याने राबवण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. या निर्णयामुळे सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण संचालनालयाकडून एमबीएच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसरी गुणवत्ता य़ादी प्रसिद्ध झाली नसून, आता नव्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध होईपर्यत विद्यार्थी-पालकांना थांबावे लागणार आहे.

जेबीआयएमएस संस्थेतील बहुतांश प्रवेश मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजांतील विद्यार्थ्यांसाठीच राखीव करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आणि तंत्रशिक्षण संचालकांनी या संस्थेतील प्रवेशांसाठी आरक्षणात बदल केल्यानंतर सीईटी कक्षाने त्याप्रमाणे ८५ टक्के जागांवर विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊन त्या जागा भरल्या. मात्र, उच्च न्यायालयाने ते सर्व प्रवेश रद्दबातल ठरवून, चार आठवड्यांच्या आत राज्यस्तरीय गुणवत्तेप्रमाणे नव्याने प्रवेशप्रक्रिया राबवण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.

'जेबीआयएमएस' संस्था स्वायत्त असल्याचे गृहित धरून प्रवेशप्रक्रिया करावी. त्यानुसार, ८५ टक्के म्हणजेच १०२ जागा या सीईटी परीक्षेतील गुणवत्तेनुसार राज्यातील इच्छुक विद्यार्थ्यांमधून भराव्यात, असे न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे. 'गुणवत्तेविषयी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यामुळे सरकारी प्रशासनाने जी प्रक्रिया अवलंबली आहे, ती कायद्यात बसणारी नाही. या प्रकरणात याचिकादार केवळ नऊ विद्यार्थी असले, तरी सर्वोच्च न्यायालयाने व्यावसायिक अभ्यासक्रमांतील प्रवेशांच्या बाबतीत गुणवत्ता राखण्याविषयी जे निकाल दिलेले आहेत, ते पाहता केवळ नऊ विद्यार्थ्यांपुरता दिलासा देऊन चालणार नाही. त्यामुळे जी प्रवेशप्रक्रिया यापूर्वी राबवली आहे ती रद्द करण्यावाचून पर्याय नाही,' असे निकालात नमूद केले आहे

......

नव्या प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा

एमबीए प्रवेशासाठी दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी रात्रीपर्यत जाहीर होणार होती. या यादीत निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना २५ आणि २६ जुलै रोजी जवळच्या एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्चित करायचा होता. २६ आणि २७ जुलै रोजी महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घ्यायचा होता. त्यानंतर २८ जुलै रोजी तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर होणार होत्या. मात्र, या निर्णयामुळे आता नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून, त्याची माहिती सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

BE / BPharm 

Check Year and Current Year Cut-offs on http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

11th Cut Off

http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

OR Download Cut-off App https://goo.gl/rT2vXd

बीई/ बीफार्म कट ऑफ http://vidyarthimitra.org/rank_predictor

 

 

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------