Higher Education

Higher Education

विद्यार्थ्यांसाठी ई-पाठशाला मार्फ़त ऑनलॉइन शैक्षणिक साहित्य उपलब्ध

PUBLISH DATE 20th April 2020

ई-पाठशाला हे पोर्टल भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग यांनी २०१५ साली सुरु केलं आहे.

ई-पाठशालामध्ये शिक्षक, विद्यार्थी, पालक, संशोधक आणि एज्युकेटर यासाठी सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य ऑनलॉइन उपलब्ध करुन दिले आहे. ई-पाठशालाची वेबसाइट आहे, तसंच मोबाइल वा टॅबलेटसाठी अॅप देखील उपलब्ध आहेत. अँड्राइड मोबाइल फोनसाठी गुगल प्ले स्टोअर, अॅपल मोबाइल फोनसाठी अॅपल स्टोअर आणि विंडोजसाठी मायक्रोसॉफ्ट स्टोअर इत्यादींवर ई-पाठशाला अॅप उपलब्ध आहे. ई-पाठशालावरील साहित्य हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत उपलब्ध आहे.

ई-पाठशालामध्ये विद्यार्थ्यांसाठी खालील गोष्टी उपलब्ध आहेत.

 1. - पहिली ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तकं (सीबीएससी बोर्डासाठीची पुस्तकं) इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषांमधून उपलब्ध आहेत. विद्यार्थी ही पुस्तकं कम्प्युटर, टॅबलेट, लॅपटॉप वा मोबाइलवर मोफत डाऊनलोड करुन वाचू शकतात.
 2. - विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी पूरक साहित्य उपलब्ध आहे.
 3. - विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती देखील दिली जाते.
 4. - विविध विषयांवरील माहितीसाठी आणि अभ्यासाच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी काही ऑडिओ-व्हिडीओ संसाधनं उपलब्ध आहेत.
 5. ई-पाठशालामध्ये शिक्षकांसाठी खालील गोष्टी उपलब्ध आहेत.
 6. - पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तकं.
 7. - शालेय शिक्षणातील प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना कसं शिकवावं यासंबंधीच्या अध्ययन सूचना पुस्तिका उपलब्ध आहेत.
 8. - विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असलेली लर्निंग आऊटकम मिळवण्यासाठी करावयाच्या गोष्टी
 9. - ऑडिओ-व्हिडीओ संसाधन
 10. - शिक्षणासंबंधी उपयुक्त नियतकालिके आणि जर्नल्स
 11. - शिक्षणविषयक विविध अहवाल, समित्यांचे रिपोर्टस, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कसंबंधीचे साहित्य इत्यादी देखील उपलब्ध आहे.
 12. - ई-पाठशालामध्ये पालकांसाठी आणि शिक्षणतज्ज्ञांसाठीदेखील निवडक मॉड्यूल्स उपलब्ध आहेत.

ई-पाठशालासंदर्भातील अधिक माहिती http://epathshala.nic.in/ या वेबसाइटवरून घेता येईल. सीबीएसइ बोर्डाच्या शाळा एनसीईआरटीद्वारे तयार केलेली पाठ्यपुस्तके वापरतात. या पाठ्यपुस्तकाबरोबर काही पूरक साहित्य सीबीएसई तयार करते. सीबीएसईची सर्व पुस्तकं ही इयत्तानिहाय http://cbse.nic.in/ या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा