Higher Education

Higher Education

बीएड च्या साडेपाच हजार जागा रिक्त

PUBLISH DATE 12th November 2019

अध्यापक पदवी अभ्यासक्रमातील (बीएड) रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येत आहे. राज्यभरात पाच हजार ६८३ जागा अद्याप रिक्त असून त्यासाठी विशेष फेरी घेतली जात आहे.

राज्य सामायिक प्रवेश पूर्व परीक्षा कक्षातर्फे बीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक हुकल्याने यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रक्रिया लांबली. त्यामध्ये सर्वाधिक प्रतीक्षा बीएडला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना करावी लागली. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तीन वेळा बदलण्यात आले. त्यानंतर प्रक्रिया मार्गी लागली. प्रवेशाच्या तीन फेऱ्यानंतरही राज्यातील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या. त्यारिक्त राहिलेल्या जागांसाठी आता प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया ११ सप्टेंबरनंतर सुरू झाली जी ऑक्टोबर अखेर संपली. नव्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता १३ नोव्हेंबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. कागदपत्र तपासणी व प्रत्यक्ष प्रवेशासाठी १४ व १५ नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आली आहे.

राज्यात बीएड प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या ३३ हजार ५९९ एवढी होती तर, प्रवेश क्षमता ३२ हजार ८१५ एवढी आहे. प्रवेशाची प्रक्रिया तीन फेरींमध्ये पूर्ण झाली. त्यातून पाच हजार ६८३ जागांवर प्रवेश झालेले नाही. प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे प्राचार्यांचे म्हणणे आहे.

बीएडची राज्यातील प्रवेश क्षमता..३२८१५

सीईटीला बसलेले विद्यार्थी........ ४६३१३

मराठी माध्यम विद्यार्थी............ ४६२८३

इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी......... १५२३४

कॅप फेरीसाठी अर्ज…………..३३५९९

प्रवेश एवढ्या जागेवर झाले…...२७१३२

रिक्त जाग………................. ५६८३

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

Check Previous Year Cut-off http://cutoff.vidyarthimitra.org

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |