Entrance Exams

Entrance Exams

आयसीएआय सीए परीक्षा २०२१: परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

PUBLISH DATE 20th November 2021

 इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India,ICAI) च्या ऑफलाइन परीक्षा डिसेंबरमध्ये सुरू होणार आहेत. ICAI ने या परीक्षाचे प्रवेशपत्र जाहीर केले आहे.
या परीक्षेलेले उमेदवार आयसीएआयची अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. सीए फाऊंडेशन, इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षा ५ ते २० डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑफलाइन माध्यमातून घेण्यात येणार आहेत.

डाउनलोड कसे करावे

  1. ICAI परीक्षेची अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर जा.
  2. लॉगिन विंडोवर जा आणि नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड भरा.
  3. दुसरी विंडो उघडल्यानंतर प्रवेशपत्र डिसेंबर लिंकवर क्लिक करा.
  4. प्रवेशपत्र डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआउट घ्या.


या गोष्टी लक्षात ठेवा
प्रवेशपत्रावरील अधिकृत नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'फाऊंडेशन, इंटरमीडिएट (IPC), इंटरमीडिएट, फायनल आणि नवीन परीक्षेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर त्यांचा फोटो आणि सही असेल. परीक्षा केंद्रावर उमेदवारांना आपली सरकारी कागदपत्राच्या आधारे स्वत:ची ओळख पटवून द्यावी लागेल. आयसीएआयने नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार प्रवेशपत्र हार्ड कॉपीद्वारे पाठवले जाणार नाही.उमेदवारांना वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.

महत्वाच्या गाईडलाइन्स
डिसेंबर २०२१ मध्ये होणार्‍या सीए परीक्षा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी संस्थांतर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. परीक्षार्थींना त्यांच्या जिल्ह्याबाहेर जावे लागू नये यासाठी परीक्षा केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे.

परीक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सही करताना आणि त्यांची ओळख करुन देताना फेसमास्क खाली करावा लागेल. परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना फेस मास्क आणि फेस शिल्ड घालावी लागणार आहे.

परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना हातमोजे, स्वत:ची पाण्याची बाटली, वैयक्तिक हँड सॅनिटायझर आणि परीक्षेशी संबंधित कागदपत्रे सोबत बाळगता येईल. गर्दी टाळण्यासाठी आणि सामाजिक अंतर राखण्यासाठी विद्यार्थ्यांना रिपोर्टींगच्या वेळेत केंद्रावर पोहोचण्यास सांगण्यात आले आहे.

अन्यथा परीक्षा केंद्रात प्रवेश नाही
परीक्षा केंद्रावर पोहोचण्यापूर्वी करोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची विद्यार्थ्यांनी खात्री करावी. परीक्षा केंद्राच्या मुख्य गेटवर थर्मल टेंपरेचर स्कॅनिंग आणि हॅन्ड सॅनिटायझेशन करावे लागेल. शरीराचे तापमान निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास विद्यार्थी आणि इतर परीक्षा अधिकाऱ्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

अंतिम परीक्षांचे वेळापत्रक
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्टस् ऑफ इंडिया अर्थात आयसीएआय (Institute of Chartered Accountants of India, ICAI)ने डिसेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनल परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. या वेळापत्रकानुसार, १३, १५, १७ आणि १९ डिसेंबर रोजी फाउंडेशन परीक्षा होणार आहेत. फाउंडेशन परीक्षा नव्या स्कीमनुसार होणार आहेत.

इंटरमिडिएट परीक्षा जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमानुसार होणार असून या परीक्षांना ६ डिसेंबरपासून सुरुवात होईल. जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा ५ ते १९ डिसेंबर २०२१ या कालावधीत होतील. जे उमेदवार या परीक्षा देणार आहेत, त्यांना संपूर्ण वेळापत्रक आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर icaiexam.icai.org येथे पाहता येईल.

इन्शुरन्स रिस्क मॅनेजमेंट (IRM)परीक्षांच्या १ ते ४ मोड्युल्सची परीक्षा ५, ७, ९ आणि ११ डिसेंबर रोजी होईल. इंटरनॅशनल ट्रेड लॉ आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन पार्ट १ परीक्षा ५ ते ११ या कालावधीत होतील.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


आयसीएआय सीए परीक्षा २०२१: परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
22nd March 2024

WBPSC Food SI

आयसीएआय सीए परीक्षा २०२१: परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
22nd March 2024

IGI Aviation Recruitment

आयसीएआय सीए परीक्षा २०२१: परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
19th March 2024

IIT-Jodhpur

आयसीएआय सीए परीक्षा २०२१: परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
17th March 2024

GATE 2024 Result Declared

आयसीएआय सीए परीक्षा २०२१: परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
8th March 2024

MAH MBA CET 2024 Begins

आयसीएआय सीए परीक्षा २०२१: परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
9th February 2024

NEET UG 2024 Registration

आयसीएआय सीए परीक्षा २०२१: परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
21st January 2024

NEET MDS 2024 Exam Postponed

आयसीएआय सीए परीक्षा २०२१: परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
18th January 2024

CUET PG 2024

आयसीएआय सीए परीक्षा २०२१: परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
31st December 2021

REET 2022: Exam dates released