Civil Services

Civil Services

यूपीएससी एनडीए एनए परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

PUBLISH DATE 12th August 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) आणि नेव्हल अकॅडमी (NA) परीक्षा (I) आणि (II) ची प्रवेशपत्रे (अॅडमिट कार्ड) ऑनलाइन जाहीर केली आहेत. एनडीएचे अॅडमिट कार्ड upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा देणारे उमेदवार ६ सप्टेंबरपर्यंत त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. यंदा केंद्रीय लोकसेवा आयोग एनडीए आणि एनएसाठी एकच सामायिक परीक्षा घेणार आहे, कारण मागील परीक्षा कोविड - १९ विषाणूच्या संक्रमण स्थितीमुळे घेण्यात आली नव्हती.

एनडीएच्या १४६ व्या कोर्ससाठी सैन्य, नौदल आणि वायूदलातील प्रवेश आणि २ जुलै २०२१ पासून सुरू होणार्‍या १०८ व्या भारतीय नौदल अकादमी कोर्ससाठी (INAC) सामायिक परीक्षा ६ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यावर्षी ही एकच परीक्षा राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए) मधील उमेदवारांच्या निवडीसाठी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून एकूण ४१३ पदांची भरती होणार आहे.

यूपीएससी एनडीए प्रवेश पत्र 2020 च्या थेट लिंकसाठी येथे क्लिक करा.

यूपीएससीने नोटीस जारी करत सांगितले होते की, 'एनडीए आणि एनए परीक्षा (I) २०२०, १९ एप्रिल २०२० रोजी घेण्यात येणार होते, कोविड -१९ च्या संसर्गामुळे ती पुढे ढकलण्यात आले. आता एनडीए आणि एनए परीक्षा (I) आणि एनडीए आणि एनए परीक्षा (II) 2020 साठी ६ सप्टेंबर रोजी एक सामायिक परीक्षा घेण्यात येईल.
त्याचबरोबर, यूपीएससीची (UPSC Civil Service Prelims Exam) नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येईल. पूर्व परीक्षेनंतर नागरी सेवेची मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी होईल. नागरी सेवा पूर्व परीक्षेसोबत (UPSC Prelims Exam 2020) भारतीय वन सेवा पूर्व परीक्षाही ४ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.