देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. प्रवेशाचा हा शेवटचा टप्पा आहे.
त्यानंतर २८ मार्च रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाईल. नीट यूजीचे काऊन्सेलिंग (NEET UG Counselling) करणार्या वैद्यकीय समुपदेशन समितीने (Medical Counseling Committee, MCC) दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजकडून बुधवार आणि गुरुवारी जागांचे तपशील तयार केले जातील. यानंतर १० ते १४ मार्चपर्यंत नोंदणीसह शुल्क भरण्याची सुविधा असणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १२ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार असून दुपारी ३ वाजेपर्यंत फी भरता येणार आहे.
वेळापत्रकानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी दुसऱ्याच दिवशी निवडी भरू शकतात. भरलेले पर्याय लॉक करण्यासाठी १४ मार्च रात्री ११. ५५ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ आणि १६ मार्च रोजी कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर १७ आणि १८ मार्च रोजी जागावाटपाची प्रक्रिया होणार आहे. १९ मार्च रोजी अंतिम निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना २० ते २७ मार्च या कालावधीत महाविद्यालयांना कळवावे लागणार आहे. त्यानंतरच जागा निश्चित होईल.
१० मार्चपासून मॉप-अप फेरी
नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ साठी एमसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, काऊन्सेलिंगच्या दोन फेऱ्यांची प्रक्रिया २७ फेब्रुवारी रोजी संपल्यानंतर मॉप-अप फेरी आयोजित करण्यात आली. या फेरीसाठी कॉलेजांना ८ आणि ९ मार्चपर्यंत सीट मॅट्रिक्सची पडताळणीसाठी वेळ देण्यात आला. उमेदवार १० ते १४ मार्च २०२२ या कालावधीत या फेरीसाठी ऑनलाइन नोंदणी करू शकतील.
उमेदवारांना त्यांची सीट चॉईस फिलिंग आणि चॉइस लॉकिंग देखील या तारखांपर्यंतच करावी लागेल. या फेरीचे नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ चे निकाल १९ मार्च रोजी जाहीर केले जाणार आहेत आणि उमेदवार मायग्रेशन सर्टिफिकेटशिवाय २० ते २७ मार्च २०२२ पर्यंत वाटप केलेल्या महाविद्यालयात अहवाल देऊ शकतील.
एमसीसीच्या सूचनेनुसार, यापुढे उमेदवारांना पदवीसाठी मायग्रेशन सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहणार नाही. देशातील अनेक उमेदवारांना महाविद्यालयांमध्ये मायग्रेशन सर्टिफिकेटच्या मागणीमुळे प्रवेश घेण्यात अडचण येत असते. त्यातून सवलत देण्याची मागणी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे केली जात होती.
तात्पुरता प्रवेश
मेडिकल काऊन्सेलिंग कमेटीने मायग्रेशन सर्टिफिकेटबाबत दिलेल्या नियमांमध्ये उमेदवारांना तात्पुरता दिलासा दिला आहे. देशभरातील महाविद्यालयांनी मायग्रेशन सर्टिफिकेट नसेल तर उमेदवारांना प्रवेश नाकारू नये आणि त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट सादर करण्यासाठी जास्तीत जास्त ७ दिवसांचा कालावधी देऊन त्यांना तात्पुरता प्रवेश द्यावा, अशी सूचना एमसीसीने केली आहे. मायग्रेशन सर्टिफिकेटशिवायही नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ अंतर्गत वाटप केलेल्या महाविद्यालयात अहवाल देऊन तात्पुरता प्रवेश घेतला जाऊ शकतो.
--------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
UGC NET December 2024, Application edit window closes today
NEET PG 2025 on June 15
DNB Allotment 2024:
NEET PG 2025 Exam On June 15;
NEET PG 2024 Admit Card Releasing On June 18
NTA NEET UG 2024 Exam Tomorrow
NEET UG 2024
NEET MDS 2023: Application correction process begins
COMDEK UGET 2023: Examination dates announced
NEET PG 2023: Application correction window to end tomorrow
NEET MDS 2022: Admit card to be released today
NEET MDS 2022: Revised exam date released
NEET-UG 2022: Check Preparation Strategy
NEET UG Counseling 2021: Registration to begin today
नीट यूजी ऑल इंडिया कोट्यातील प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर २०२१
NEET 2021: State-Wise List Of Top Medical Colleges
AIIMS Releases MBBS Exam Schedule 2021
National Eligibility Entrance Test PG Examination 2021: Registration begins
नीट समुपदेशन २०२०: दुसऱ्या फेरीची प्रक्रिया लांबणीवर
NEET Counselling 2020 provisional result declared: For 1st round
नीट पीजी परीक्षा २०२१ लांबणीवर: जाणून घ्या