Entrance Exams

Entrance Exams

नीट यूजी ऑल इंडिया कोट्यातील प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर २०२१

PUBLISH DATE 18th January 2022

 नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) नीट यूजी काऊन्सेलिंगचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) द्वारे पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १५ टक्के अखिल भारतीय कोट्यातील जागांसाठी ऑनलाइन समुपदेशन केले जाईल.

एनएमसीने नीट समुपदेशन संदर्भात जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, केंद्रीय संस्था आणि AIQ जागांसाठी समुपदेशनाचा पहिला टप्पा १९ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान एमसीसीद्वारे आयोजित केला जाणार आहे.

राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशातील अखिल भारतीय कोट्यातील जागांवरील प्रवेशासाठी हे काऊन्सेलिंग केले जाणार आहे. राज्यांमधील यूजी काऊन्सेलिंग २७ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत पूर्ण करावे लागेल. यानंतर केंद्रीय जागांसाठी ४ फेब्रुवारीपर्यंत आणि राज्याच्या जागांसाठी ७ फेब्रुवारीपर्यंत जॉईनिंग घ्यावे लागेल. एनएमसीने जारी केलेल्या नीट यूजी समुपदेशन २०२१-२२ नुसार, MCC द्वारे दुसऱ्या टप्प्यातील समुपदेशन ९ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान पूर्ण करावे लागेल.

दुसऱ्या टप्प्यातील काऊन्सेलिंग
समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीनंतर उमेदवारांना २६ फेब्रुवारीपर्यंत सहभागी व्हावे लागेल. त्याच वेळी, राज्य कोट्यातील जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील समुपदेशन १५ ते १८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत होणार असून उमेदवारांना २४ फेब्रुवारीपर्यंत सहभागी व्हावे लागेल.

उरलेल्या जागांसाठी २१ आणि २२ मार्च रोजी समुपदेशन होईल आणि उमेदवारांना २६ मार्चपर्यंत नावनोंदणी करावी लागेल. त्याच वेळी, राज्यांच्या उर्वरित जागांसाठी १६ मार्च रोजी समुपदेशन होणार असून २० मार्च ही सहभागी होण्याची शेवटची तारीख आहे.

नीट यूजी ८५ टक्के काऊन्सेलिंग (NEET UG 85% Counseling) साठी अनेक राज्यांनी त्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नोंदणीसह अन्य प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांनी नीट यूजी राज्य काऊन्सेलिंग २०२१ नोटिफिकेशन जाहीर केले आहे.


नीट पीजी १ फेरीची नोंदणी बंद
वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) तर्फे नीट पीजी काऊन्सेलिंग २०२१ च्या पहिल्या फेरीसाठी १७ जानेवारी २०२२ रोजी नोंदणी प्रक्रिया बंद केली जाईल. पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट, mcc.nic वर नीट पीजी काऊन्सेलिंग २०२१ च्या पहिल्या राऊंडसाठी स्वत:ची नोंदणी करता येणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


नीट यूजी ऑल इंडिया कोट्यातील प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर २०२१
19th March 2024

NEET UG 2024