Engineering

Engineering

फार्मसी, इंजिनीअरिंग, थेट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२०-२१

PUBLISH DATE 9th December 2020

 राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनीअरिंग (बीई) आणि फार्मसी पदवी (बीफार्म) अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना आज ९ डिसेंबर बुधवारपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागेल.

इंजिनीअरिंगसाठी १५ डिसेंबरपर्यत नोदणी, तर १६ डिसेंबरपर्यत कागदपत्रांची पडताळणी व अर्जाचे कन्फर्मेशन करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे फार्मसीसाठी १४ डिसेंबरपर्यत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागेल. तर, १५ डिसेंबरपर्यत कागदपत्रांची पडताळणी व अर्जाचे कन्फर्मेशन करावे लागणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार इंजिनीअरिंगसाठी १५ डिसेंबरनंतर नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचार 'नॉन कॅप'साठी करण्यात येणार आहे. तर, फार्मसीसाठी १४ डिसेंबरपर्यत नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार 'नॉन कॅप'साठी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती; तसेच वेळापत्रक सीईटी सेलच्या www.mahacet.org वेबसाइटवर उपलब्ध आहे, अशी माहिती सेलकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रथम वर्ष फार्मसी पदवी अभ्यासक्रम वेळापत्रक

  1. अर्ज नोंदणी - ९ ते १४ डिसेंबर
  2. कागदपत्रे पडताळणी व कन्फर्मेशन - ९ ते १५ डिसेंबर
  3. प्राथमिक गुणवत्ता यादी - १७ डिसेंबर
  4. आक्षेप नोंदवणे - १८ व १९ डिसेंबर
  5. अंतिम गुणवत्ता यादी - २१ डिसेंबर
  6. प्रवेशक्षमता जाहीर होणे - २१ डिसेंबर
  7. पहिल्या फेरीसाठी पर्याय निवडणे - २२ ते २४ डिसेंबर
  8. निवड यादी जाहीर होणे - २७ डिसेंबर
  9. प्रवेश निश्चिती - २८ ते ३० डिसेंबर
  10. कागदपत्रे व शुल्क जमा करणे - २८ ते ३० डिसेंबर
  11. दुसऱ्या फेरीसाठी प्रवेशक्षमता जाहीर - ३१ डिसेंबर
  12. कॉलेजांचे पर्याय निवडणे - १ ते ३ जानेवारी
  13. निवड यादी जाहीर - ५ जानेवारी
  14. प्रवेश निश्चिती - ६ ते ८ जानेवारी
  15. कागदपत्रे व शुल्क जमा करणे - ६ ते ८ जानेवारी
  16. शैक्षणिक वर्षाला सुरुवात - ४ जानेवारी
  17. कट ऑफ तारीख - १४ जानेवारी

प्रथम वर्ष इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रम वेळापत्रक

  1. अर्ज नोंदणी - ९ ते १५ डिसेंबर
  2. कागदपत्रे पडताळणी व कन्फर्मेशन - ९ ते १६ डिसेंबर
  3. प्राथमिक गुणवत्ता यादी - १८ डिसेंबर
  4. आक्षेप नोंदवणे - १९ व २० डिसेंबर
  5. अंतिम गुणवत्ता यादी - २२ डिसेंबर
  6. प्रवेशक्षमता जाहीर होणे - २२ डिसेंबर
  7. पहिल्या फेरीसाठी पर्याय निवडणे - २३ ते २५ डिसेंबर
  8. निवड यादी जाहीर होणे - २८ डिसेंबर
  9. प्रवेश निश्चिती - २९ ते ३१ डिसेंबर
  10. कागदपत्रे व शुल्क जमा करणे - २९ ते ३१ डिसेंबर
  11. दुसऱ्या फेरीसाठी प्रवेशक्षमता जाहीर - १ जानेवारी २०२१
  12. कॉलेजांचे पर्याय निवडणे - २ ते ४ जानेवारी
  13. निवड यादी जाहीर - ६ जानेवारी
  14. प्रवेश निश्चिती - ७ ते ९ जानेवारी
  15. कागदपत्रे व शुल्क जमा करणे - ७ ते ९ जानेवारी
  16. शैक्षणिक वर्षाला सुरुवात - ४ जानेवारी
  17. कट ऑफ तारीख - १४ जानेवारी

थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया जाहीर

सीईटी सेलकडून थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग पदवी प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आज बुधवार ९ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तर, अंतिम मुदत १४ डिसेंबर आहे. त्याचप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी; तसेच अर्जाचे कन्फर्मेशन १५ डिसेंबरपर्यत करायचे आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी १७ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. यादीबाबत विद्यार्थ्यांना १८ व १९ डिसेंबर रोजी आक्षेप नोंदवता येईल. त्यानंतर २१ रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन, विद्यार्थ्यांना २२ ते २४ डिसेंबर दरम्यान कॉलेजांचे पर्याय निवडता येईल. निवड यादी २८ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यावर, विद्यार्थ्यांना २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान प्रवेश निश्चिती करायची आहे. याच कालावधीत कॉलेजमध्ये कागदपत्रे व शुल्क जमा करुन प्रवेश घ्यायाचा आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीला १ जानेवारी २०२१ ला सुरुवात होईल.

थेट द्वितीय वर्ष फार्मसी पदवी प्रवेश प्रक्रिया जाहीर

सीईटी सेलकडून थेट द्वितीय वर्ष फार्मसी पदवी प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आज बुधवार ९ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तर, अंतिम मुदत १४ डिसेंबर आहे. त्याचप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी; तसेच अर्जाचे कन्फर्मेशन १५ डिसेंबरपर्यत करायचे आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी १७ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. यादीबाबत विद्यार्थ्यांना १८ व १९ डिसेंबर रोजी आक्षेप नोंदवता येईल. त्यानंतर २१ रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन, विद्यार्थ्यांना २२ ते २४ डिसेंबर दरम्यान कॉलेजांचे पर्याय निवडता येईल. निवड यादी २७ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यावर, विद्यार्थ्यांना २८ ते ३० डिसेंबर दरम्यान प्रवेश निश्चिती करायची आहे. याच कालावधीत कॉलेजमध्ये कागदपत्रे व शुल्क जमा करुन प्रवेश घ्यायाचा आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीला ३१ डिसेंबरला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र सीईटी कक्षाच्या (CET Cell) अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.