Engineering

Engineering

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर इंजिनीअरिंग पदवी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर २०२१

PUBLISH DATE 21st December 2021

गेट परीक्षा २०२२ साठी नोंदणी केलेल्या आणि परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे.

या परीक्षेचे आयोजन करणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूर संस्थेने इंजिनीअरिंग पदवी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उमेदवारांना गेट २०२२ परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर पाहता येणार आहे. २० डिसेंबर २०२१ रोजी संस्थेने परीक्षा पोर्टलवर हे वेळापत्रक जाहीर केले आहे.

फेब्रुवारी २०२२ महिन्यातील चार तारखांना परीक्षा घेतली जाणार आहे. ४ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान ही परीक्षा होणार आहे. त्यापैकी ४ फेब्रुवारी आणि ११ फेब्रुवारी या परीक्षेसंबंधित विविध कामांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

१२ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पहिल्या सत्रात CE-1, BT, PH आणि EY पेपर होणार आहे. यानंतर दुपारी २.३० ते ५.३० ला दुसऱ्या शिफ्टमध्ये CE-2, XE आणि XL चे पेपर होणार आहेत. वेळापत्रकाच्या शेवटच्या दिवशी १३ फेब्रुवारीला सकाळच्या शिफ्टमध्ये ME-1, PE आणि AR चे पेपर आणि दुपारच्या शिफ्टमध्ये ME-2, GE आणि AE होणार आहे.

३ जानेवारीला प्रवेशपत्र
आयआयटी खरगपूरने गेट परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्राची तारीख जाहीर केली होती. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांना ३ जानेवारी २०२२ पासून परीक्षा पोर्टलवर जाऊन त्यांचे गेट २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.

परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा

--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.