Entrance Exams

Entrance Exams

जेईई मेन परीक्षा २०२१: ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ

PUBLISH DATE 18th January 2021

 नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ने जेईई मेन २०२१ परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली आहे. 

जेईई मेन परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत शनिवारी १६ जानेवारी रोजी संपत होती. एनटीएने ती २३ जानेवारीपर्यंत वाढवली आहे.

एनटीएने यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, उमेदवार २३ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जांची प्रक्रिया १६ डिसेंबर २०२० पासून सुरू झाली आहे. ती २३ जानेवारी २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. अर्जांचे शुल्क भरण्याची अखेरची मुदत २४ जानेवारी २०२१ आहे.

फेब्रुवारी महिन्यातील २३, २४, २५ आणि २६ या तारखांना जेईई मेन २०२१ चा पहिला टप्पा पार पडणार आहे. देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य सीएफटीआय संस्थांमधील अभियांत्रिकीच्या यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते.

यंदा तब्बल चार वेळा ही परीक्षा होणार आहे. फेब्रुवारीव्यतिरिक्त मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात या परीक्षेचे अन्य तीन टप्पे पार पडणार आहे.

विद्यार्थ्यांनी https://jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत. विद्यार्थी एका किंवा एकापेक्षा अधिक टप्प्यातील परीक्षा देऊ शकतात. त्यांचे सर्वोतम गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

दरम्यान, JEE Main 2021 साठी अर्जात दुरुस्ती असल्यास ती करण्यासाठी २७ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा विंडो ओपन होणार आहे. दुरुस्तीसाठी अखेरची मुदत ३० जानेवारी २०२१ आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.