Entrance Exams

Entrance Exams

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

PUBLISH DATE 19th October 2021

डिसेंबर २०२१ सत्राच्या CTET २०२१ परीक्षेसाठी अंतिम मुदतीपर्यंत अर्ज करु न शकलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ (अर्थात CTET डिसेंबर २०२१) साठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे.

मंडळाने १८ ऑक्टोबर २०२१ रोजी यासंदर्भात सूचना जाहीर केली. त्यानुसार उमेदवार आता २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. CTET २०२१ नोंदणीची प्रक्रिया २० सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे.

या परीक्षेसाठी नोंदणी करणारे उमेदवार २६ ऑक्टोबर २०२१ च्या दुपारी ३.३० पर्यंत अर्ज शुल्क भरू शकतील. यापूर्वी CBSE तर्फे सीईटी २०२१ नोंदणी विंडो १९ ऑक्टोबर २०२१ रोजी बंद करण्यात येणार होती. तसेच अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्ज शुल्क २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत भरता येणार होते. यानंतर अर्ज शुल्काची पडताळणी २१ ऑक्टोबरपर्यंत करावी लागणार होती.

३ नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज
सीबीएसईने जाहीर केलेल्या ताज्या सीटीईटी २०२१ च्या वेळापत्रकानुसार, उमेदवार आता २८ ऑक्टोबर २०२१ पासून त्यांच्या ऑनलाइन अर्जात सुधारणा करू शकतील. ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत CTET २०२१ अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी विंडो खुली ठेवण्याची घोषणा मंडळाने केली आहे. यापूर्वी अर्ज दुरुस्तीची विंडो २२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत खुली राहणार होती.

एका पेपरसाठी १ हजार आणि दोन्हीसाठी १२०० रुपये शुल्क
सीबीएसईद्वारे सीटीईटी परीक्षमध्ये दोन पेपर घेतले जातात. पहिली ते पाचवीच्या इयत्तांचे शिक्षक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना पेपर १ मध्ये, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी उमेदवारांना पेपर २ मध्ये उपस्थित राहावे लागेल.

सीबीएसई CTET २०२१ च्या नोटीसनुसार, एका पेपरसाठी (पहिली किंवा दुसरी) परीक्षा फी १००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर दोन्ही पेपरसाठी एकूण १२०० रुपये भरावे लागतील. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी दोन्ही पेपरची फी फक्त ६०० रुपये आहे.

CTET परीक्षा १६ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान होणार आहे.सीबीएसईने जाहीर केलेल्या सीटीईटी २०२१ माहिती बुलेटिन आणि १७ सप्टेंबर २०२१ च्या नोटिसनुसार, सीटीईटी डिसेंबर २०२१ परीक्षा १६ डिसेंबर ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान वेगवेगळ्या तारखांना घेण्यात येणार आहे. बोर्डाद्वारे उमेदवारांना दिलेल्या CET २०२१ प्रवेशपत्रावर परीक्षेची तारीख आणि वेळेबद्दल माहिती मिळेल.

CTET २०२१ माहिती बुलेटिन पाहण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा