Entrance Exams

Entrance Exams

एमबीए प्रवेशासाठी राज्य सरकारची 'सीईटी', 'सीमॅट' आणि 'कॅट' परीक्षाच ग्राह्य

PUBLISH DATE 19th March 2020

एमबीए प्रवेशासाठी अखिल भारतीय उमेदवारी प्रकारात राज्य सरकारची 'सीईटी', 'सीमॅट' आणि राष्ट्रीय स्तरावर होणारी 'कॅट' परीक्षा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात एमबीए प्रवेशासाठी इतर कोणतीही खासगी व्यवस्थापनाची प्रवेशपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीएला प्रवेश घेता येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

राज्यातील व्यवस्थापन कॉलेजांमध्ये एमबीए प्रवेशासाठी आतापर्यंत 'जीमॅट', 'मॅट', 'अॅटमा' आणि 'क्झॅट' अशा प्रवेशपरीक्षांचा निकाल ग्राह्य धरण्यात येत होता. या परीक्षा खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमातून घेण्यात येत होत्या. मात्र, या प्रवेशपरीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसणे, निकाल जाहीर झाल्यानंतर गुण पडताळणीसाठी ऑनलाइन यंत्रणा नसणे, परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी उद्भवणे अशा समस्या समोर आल्या. त्यामुळे अनेक प्रामाणिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले.

त्याचप्रमाणे २०१८-१९मध्ये २६ विद्यार्थ्यांनी बनावट गुणपत्रिकेच्या आधारे एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे २०१९-२०मध्ये काही विद्यार्थ्यांनी बनावट गुणपत्रिकेच्या आधारे एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे एकूण परिस्थिती लक्षात घेता राज्यात एमबीए प्रवेशासाठी कोणत्या प्रवेश परीक्षा ग्राह्य धराव्यात याबाबत मार्गदर्शन व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यासोबतच तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीकडून आलेल्या सूचनांनुसार २०२०-२१साठी एमबीए प्रवेशासाठी केवळ राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) घेण्यात येणारी एमबीए-सीईटी, राष्ट्रीय स्तरावरील 'सीमॅट' आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) घेण्यात येणारी 'कॅट' परीक्षा ग्राह्य धरावी. जीमॅट, मॅट, ऍटमा आणि 'क्झॅट' वगळाव्यात, असे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा