अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सामान्य विज्ञान घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत करण्यात आला आहे.अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सामान्य विज्ञान घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत करण्यात आला आहे.
‘भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व आरोग्यशास्त्र’
गट ब अराजपत्रित आणि गट क सेवांच्या पूर्व परीक्षांमध्येही सामान्य विज्ञान घटकाचा अभ्यासक्रम हाच होता. या दोन्ही सेवांसाठीच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे मागील लेखामध्ये पाहिले. प्रत्यक्ष तयारी कशी करावी ते या लेखामध्ये पाहू.
या घटकावरील बहुविधानी प्रश्नांमध्येही काठीण्य पातळी ही मूलभूत अभ्यास झालेल्या उमेदवारांना कॉमन सेन्सने सोडविता येतील अशा प्रकारची आहे. हे लक्षात घेऊन तयारी कएल्यास अनावश्यक ताण दूर होऊन आत्मविश्वासाने तयारी करता येईल.
सर्व शाखांमधील शोध व शोधकर्ते वैज्ञानिक यांवरचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. उपघटकनिहाय तयारी पुढीलप्रमाणे करता येईल:
भौतिक शास्त्र
बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती, उष्णता, तापमान, पदार्थाचे अवस्थांतर, मापन पद्धती (राशी व एकके) हे लहान घटक वस्तुनिष्ठ अभ्यासाठी सोपे ठरतात. या घटकांच्या नोट्स ढोबळ मुद्द्यांच्या स्वरुपात पुरेशा ठरतात.
प्रकाश, ध्वनी, भिंग, धाराविद्याुत, चुंबकत्व, गती व गतिविषयक समीकरणे हे मोठे व महत्त्वाचे घटक आहेत. यांवर मूलभूत संकल्पना आणि गणिते विचारली जाऊ शकतात. या सर्वच मुद्द्यांच्या तयारीसाठी संज्ञा आणि संकल्पनांचे आकलन महत्त्वाचे आहे.
आधी लहान घटकांमधील वस्तुनिष्ठ बाबी व त्यांच्या संकल्पना व्यवस्थित पाठ कराव्यात. त्यांचा मोठ्या घटकांचा अभ्यास करताना प्रत्येक वेळी उपयोग होतो.
महत्त्वाचे सिद्धांत व ते मांडणारे शास्त्रज्ञ यांचा टेबल तयार करावा.
रसायन शास्त्र
द्रव्य, त्यांचे स्वरूप व त्यांच्या अवस्था, मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्ट्ये, अणूंची संरचना व त्याविषयी विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत, अणूंची मांडणी करण्यासाठी बनविलेली आवर्तसारणी व तिच्यामध्ये होत गेलेले बदल, आधुनिक आवर्तसारणी व तिची ठळक वैशिष्ट्ये, काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा, धातू, अधातू, धातू सदृश धातुके, संयुगे व त्यांची निर्मिती, कार्बनी व अकार्बनी संयुगे, आम्ल, आम्लारी व क्षार तसेच त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिया, मिश्रण व त्यांची निर्मिती
या मुद्द्यांचा त्याच क्रमाने अभ्यास केल्यास त्यांच्यामध्ये असलेल्या परस्पर संबंधांमुळे विषय समजून घेणे आणि लक्षात राहणे सोपे होते. यासाठी राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची विज्ञान विषयाची जुनी तसेच नवी पुस्तके जास्त उपयोगी ठरतील.
वनस्पती व प्राणिशास्त्र
● वर्गीकरणाच्या पद्धती व संबंधित शास्त्रज्ञ, विविध संच व विभाग व त्यातील प्राणी/वनस्पती व त्यांची वैशिष्ट्ये हा अभ्यास टेबलमध्ये करावा.
● अवयव संस्थांमधील वस्तुनिष्ठ बाबींवरच लक्ष द्यावे. प्रत्येक संस्थेवर किमान १० प्रश्न स्वत: तयार करावेत.
● विविध सूक्ष्मजीव, त्यांचे वर्गीकरण, महत्वाची वैशिष्ट्ये, त्यांपासून होणारे फायदे-तोटे यांचा एक टेबल करावा.
आरोग्यशास्त्र
यामध्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे तक्ता बनवून अभ्यास केल्यास सगळ्या संबंधित गोष्टी लक्षात ठेवणे सोपे आणि सोयीचे होते.
स्थूल व सूक्ष्म पोषणद्रव्ये – कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्वे, खनिज व क्षार या पोषणद्रव्यांपासून मिळणारी ऊर्जा, त्यांचे महत्त्वाचे घटक, स्राोत, या पोषक द्रव्यांचे सर्वसाधारण नाव, मानवी आरोग्यामध्ये महत्व, शरीरावरील त्यांचे परिणाम, कमतरता/ अभाव आणि आधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या इ. मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करावा.
रोगांचे प्रकार- जीवणूजन्य, विषाणूजन्य, कवकजन्य, आदिजीवजन्य, संसर्गजन्य, असंसर्गजन्य, लैंगिकदृष्ट्या पारेषित होणारे, अनुवंशिक आजार. या सर्व रोगांची लक्षणे, कारणीभूत घटक, स्राोत, प्रसाराचे माध्यम, बाधित होणारे अवयव, उपचार पद्धती.
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा रोग जास्त चर्चेमध्ये असेल तर त्याचे स्थान, प्रसार, उपचारासाठी केले जात असणारे प्रयत्न इ. चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमामध्ये स्पष्टपणे नमूद न केलेला पण स्वतंत्रपणे विचारण्यात येणारा एक घटक आहे मानवी शरीर रचना शास्त्र. याबाबत सर्व अवयव संस्थांचा पुढील मुद्द्यांच्या आधारे व्यवस्थित आढावा घ्यायला हवा – अवयव संस्थेची रचना, समाविष्ट अवयव, अवयव संस्थेचे कार्य तसेच घटक अवयवांचे कार्य, संबंधित आजार इ.
चालू घडामोडी
या घटकाच्या पुढील मुद्द्यांची अद्यायावत माहिती असायला हवी.
● आरोग्य, पोषण, पर्यावरणाशी संबंधित शाश्वत विकास उद्दीष्टे आणि त्याबाबत भारतातील उपक्रम याबाबतचे WHO व इतर संघटनांचे निर्देशांक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत असलेला रोग, त्याचे उगम स्थान, प्रसार, उपचारासाठीचे प्रयत्न आरोग्य व पोषणाबाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या महत्त्वाच्या तरतुदी
● विज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार
● विज्ञान क्षेत्रातील नवे शोध व चर्चेतील संशोधने
Register for Free Mock Test:
------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.