Higher Education

Higher Education

Success Tips: मनातील भीती काढण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या, जाणून घ्या.

PUBLISH DATE 20th May 2024

                                                                                                                                                               Success Tips

अनेक लोकांना कधी ना कधी भीती वाटतेच. लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंत अनेक प्रकारच्या गोष्टींची भीती वाटते. काही भीती आपल्याला धोक्यांपासून वाचवतात, परंतु काही भीती आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतात.

भीती आपल्याला कमकुवत बनवते, आपला आत्मविश्वास कमी करते आणि यश मिळविण्यात अडथळा निर्माण करते. भीती काढून टाकून तुम्ही एक साहसी आणि यशस्वी बनू शकता. यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घेऊया.

कल्पनाशक्ती वापरा

कल्पनाशक्ती वापरून तुम्ही तुमच्या भीतीवर मात करू शकता. स्वतःला अशा स्थितीत कल्पना करा जिथे तुम्ही घाबरत असाल, परंतु तुम्हाला शांत, आत्मविश्वास आणि यशस्वी वाटत असेल. हे दृश्य तुमच्यासाठी वास्तविक होईपर्यंत पुन्हा पुन्हा करा.

हळूहळू भीतीला सामोरे जावे

एकदा तुम्ही तुमची भीती समजून घेतली आणि त्याला सामोरे जाण्यासाठी तयारी केली की हळूहळू सामोरे जाता येते. छोट्या पावलांनी सुरुवात करा आणि हळूहळू अधिक आव्हानात्मक परिस्थितींकडे जाण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या भीतीचा सामना करता तेव्हा तुम्ही अधिक मजबूत होता आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो.

कोणत्या गोष्टीची भीती वाटते

सर्वात आधी आपण आपली भीती ओळखणे गरजेचे आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टींची भीती वाटते? तुमच्या भीतीचे कारण काय? एकदा तुम्हाला तुमची कोणत्या गोष्टीमुळे भीती वाटते हे समजले की, तुम्ही त्याला सामोरे जाण्यासाठी तयारी करू शकता.

नकारात्मक विचार दूर ठेवावे

अनेकवेळा नकारात्मक विचारांमुळे भीती निर्माण होते. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा तुमच्या मनात नाकारात्मक विचार सुरू होतात. अशा नकारात्मक विचारांपासून दूर राहा.

सकारात्मक लोकांसोबत रहा

तुम्ही ज्या लोकांसोबत राहता त्यांचा देखील तुमच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. सकारात्मक आणि उत्साही लोकांभोवती असणं तुम्हाला प्रेरित करेल आणि आत्मविश्वास वाढेल. नकारात्मक आणि निराशावादी लोकांपासून दूर राहिल्यास भीती कमी होईल.

 

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.