दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी (SSC HSC Practical Exam 2022) बाह्यपरीक्षक न बोलावता अंतर्गत परीक्षकाच्या साह्यानेच परीक्षा घेण्याची परवानगी शाळांना देण्यात आली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या या परवानगीमुळे विद्यार्थ्यांवर प्रात्यक्षिकांच्या गुणांची खैरात होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्यात १४ पेब्रुवारीपासून बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. दहावी, बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेताना राज्य मंडळाने शाळांना काही सूचना केल्या आहेत. यामध्ये शाळांना अंतर्गत परीक्षकासह तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे आता राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकच त्यांच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी व प्रात्यक्षिकांच्या परीक्षा घेणार आहेत. राज्यामध्ये दहावी आणि बारावीसाठी ८० आणि २० गुणांचा पॅटर्न राबवला जातो. ८० गुण लेखी परीक्षेसाठी आणि २० गुण वर्षभराची प्रात्यक्षिकांची कामगिरी आणि अंतिम तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा यासाठी दिले जातात. यापूर्वी अंतिम तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेला बाह्यपरीक्षक असल्याने विद्यार्थी या परीक्षांना महत्त्व देत होते. परंतु, यंदा शाळेतील शिक्षकच परीक्षा घेणार असल्याने आता विद्यार्थ्यांवर प्रात्यक्षिकांच्या गुणांची खैरात केली जाईल, अशी भिती शिक्षण क्षेत्राच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
यासह प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करूनच घेण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना एकाच वेळी न बोलावता टप्प्याटप्प्याने बोलवावे, असे राज्य मंडळाने सांगितले आहे.
राज्य मंडळाच्या मार्गदर्शक सूचना
१. प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत शिक्षकांनीच घ्याव्यात.
२. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांची गर्दी करू नये.
३. परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासावे.
४. टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात.
५. सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळावेत.
--------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
UP Board Class 10, 12 Compartment Results 2024 Released
CG SET 2024 Admit Card Issued
दहावी, बारावी परीक्षा २०२२: लेखी परीक्षेसाठी अंतिम वेळापत्रक जाहीर
Kerala SSLC Revaluation Result declared 2022
बारावी परीक्षा २०२२: परीक्षेसाठी नियमावली जाहीर