Board Exams

Board Exams

पुणे महानगरपालिका : इ. १२ उत्तीर्ण विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य 

PUBLISH DATE 5th July 2025

पुणे महानगरपालिका : इ. १२ उत्तीर्ण विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य 

इ. १२ वी मध्ये किमान ७० टक्के मार्कस मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जास्तीत जास्त रू. २५०००/- अनुदान देणेत येते.


1. शैक्षणिक निकष:-
· मागासवर्गीय / पुणे महानगरपालिका शाळा / रात्र शाळा:- किमान ७०% टक्केवारीची आवश्यकता आहे.
· अंध असणाऱ्या विद्यार्थीला इ. १२ वी मध्ये उत्तीर्ण झाल्यास टक्केवारीची आवश्यकता नाही.
· दिव्यांगत्व ४०% पेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान ५५% टक्केवारीची आवश्यकता आहे.
2. इतर निकष:-
· विद्यार्थ्यांना १२ वी नंतर शासन मान्यता प्राप्त किंवा विद्यापीठ मान्य संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.
· दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्मलेले व ह्यात अपत्यामुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त झाल्यास लाभ घेता येणार नाही.
3. आवश्यक कागदपत्रे-
1. ओळख आणि वास्तव्याचा पुरावा:-

  •  रेशनिंग कार्ड:- अपत्याच्या पडताळणीसाठी रेशनिंग कार्डची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे. (रेशनिंग कार्डच्या पहिल्या व नावांच्या पानाची स्कॅन कॉपी जोडणे आवश्यक आहे.)
  • वास्तव्याचा पुरावा (पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे):-

मागील ३ वर्षांचा मनपा कर पावती.
लाईट बिल.
लँडलाइन टेलिफोन बिल.
झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती /
भाडे करारनामा या पैकी एकाची मूळ प्रत स्कॅन
करून जोडणे आवश्यक आहे.
2. इतर कागदपत्रे:

  •  आधार कार्ड आणि बँक पासबुक :- आधार कार्ड व बँक पासबुक एकमेकांना संलग्न करून त्यांची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे
  •  वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला/ससून रुग्णालयाचा जन्माचा दाखला, शाळेचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र इ.पैकी एकाची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
  •  जात प्रमाणपत्र :- मागासवर्गीय असल्यास जातीच्या दाखल्याची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
  •  दिव्यांगत्व प्रमाणपत्र :- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र.
  •  बोर्ड मार्कशीट :- १२ वी बोर्ड मार्कशीटची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
  •  CBSE किंवा ICSE शाळांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेचे टक्केवारी प्रमाणपत्रावर शाळेचा शिक्का व शाळा प्रमुखाचा सही व शिक्का घेऊन स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
  •  पुणे महानगरपालिकेच्या शाळेत किंवा रात्र शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तेच निकष लागू होतील.

3. महाविद्यालय प्रवेश संबंधित कागदपत्रे :-

  •  प्रवेश शुल्क पावती आणि प्रवेश पत्राची मूळ प्रत स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
  •  महाविद्यालय प्रमुखाच्या शिफारसीतील सर्व रकाने भरणे आवश्यक आहे.

महत्वाच्या नियम आणि अटी-
1. शैक्षणिक सहाय्य:-

  •  जास्तीत जास्त र.रु.२५,०००/- रक्कम प्रदान केली जाईल.
  •  जर अर्जांची संख्या पुणे महानगरपालिका बजेटच्या उपलब्ध निधीपेक्षा जास्त झाली, तर अर्जदारांना समान रक्कम किंवा र.रु.२५,०००/- कमाल रक्कम दिली जाईल.

3. अर्ज प्रक्रिया आणि पुनरावलोकन:
अर्ज स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागाच्या उपआयुक्तांकडे राहील.
उपआयुक्तांचा निर्णय अंतिम असे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Government Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send a WhatsApp message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.