महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल मे महिन्यात घेण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेला बसणाऱ्या रिपीटर आणि श्रेणीसुधारची सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 टक्के अभ्यासक्रम कपातीचा कोणताही लाभ दिला जाणार नाही.
त्यामुळे या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या पूर्ण अभ्यासक्रमावरच आधारित परीक्षा द्यावी लागणार असल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना आणि त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने 24 जुलै रोजी दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता जे विद्यार्थी दहावी आणि बारावीला रिपीटर आहेत आणि जे श्रेणीसुधार या योजनेच्या माध्यमातून पुन्हा परीक्षा देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ही पूर्ण विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.
राज्यात मागील मार्च महिन्यापासून कोणत्याही प्रकारचे शाळा, महाविद्यालय सुरू नव्हती. तसेच विविध प्रकारचे क्लासेससुद्धा बंद होती. त्यामुळे जे रिपीटर आणि श्रेणीसुधार विद्यार्थी होते, त्यांनाही पुन्हा नव्याने अभ्यास करता आला नाही. कोरोनाच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी दडपणाखाली होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सुद्धा 25 टक्के अभ्यासक्रम कपातीची सवलत देणे आवश्यक होते.
मात्र आता परीक्षा काही महिने शिल्लक असताना शालेय शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढून या विद्यार्थ्यांवर अन्याय केल्या असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली.
Get complete Admission Guidance without stepping out of your house.
Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance
Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group
Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission
Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
CGBSE Class 10, 12 Compartment Admit Card 2024 Released
राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल २०२२