भारतीय वायु सेना - जुलै, २०२५ पासून सुरू होणाऱ्या कोर्सेसमधील प्रवेशाकरिता एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (AFCAT- ०२/२०२४/ NCC Special Entry) परीक्षा घेणार आहे.
भारतीय वायूसेनेतील संधी
कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना (पुरुष/ महिला) AFCAT Entry/ एनसीसी स्पेशल एन्ट्रीमधून भारतीय वायूसेनेत कमिशण्ड ऑफिसर म्हणून सामील होण्याची सुवर्णसंधी. भारतीय वायु सेना – जुलै, २०२५ पासून सुरू होणाऱ्या कोर्सेसमधील प्रवेशाकरिता एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (AFCAT- ०२/२०२४/ NCC Special Entry) परीक्षा घेणार आहे.
पात्रता : (१२ वीला फिजिक्स आणि गणित विषयात प्रत्येकी ५० टक्के गुण आवश्यक) आणि (i) पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण (कोणतीही शाखा) किंवा (ii) B.E./ B.Tech. ६० टक्के गुण किंवा (iii) a.m.i.e. ६० टक्के गुण.
(२) ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल ब्रँच) – (i) एअरोनॉटिकल इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स), AE(L), SSC – १११ पदे (पुरुष – ८८ व महिला – २३).
पात्रता : (१२ वीला फिजिक्स आणि गणित विषयात प्रत्येकी किमान ५० टक्के गुण आवश्यक) आणि कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ आय.टी./ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन इ. मधील इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि (i) किंवा (ii) A.M.I.E. किंवा I.E.T.E. कडील G.M.E. ६० टक्के गुण.
(ii) एअरोनॉटिकल इंजिनिअर (मेकॅनिकल) AE (M), SSC – ४५ पदे (पुरुष – ३६ व महिलांसाठी – ९).
पात्रता : (१२ वीला फिजिक्स आणि गणित विषयांत प्रत्येकी किमान ५० टक्के गुण आवश्यक) आणि मेकॅनिकल/ प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल/ एअरोस्पेस/ एअरोनॉटिकल/ मेकॅट्रॉनिक्स/ इंडस्ट्रियल इ. विषयांतील इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि/ किंवा A.M.I.E. ६० टक्के गुण.
(३) ग्राऊंड ड्युटी (नॉन-टेक्निकल ब्रँच) –
(i) अॅडमिन – SSC – ५४ पदे (पुरुष – ४३ व महिला – ११).
(ii) लॉजिस्टिक्स – SSC – १७ पदे (पुरुष – १३ व महिला – ४).
पात्रता : अॅडमिन व लॉजिस्टिक्स ब्रँचसाठी १२ वी आणि पदवी (कोणत्याही शाखेतील) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (iii) अकाऊंट्स – SSC – १२ पदे (पुरुष – १२ व महिला – २).
पात्रता : १२ वी आणि खालीलपैकी एक पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (बी.कॉम./ बी.बी.ए./ बी.एम.एस./ बी.बी.एस./ बी.एस्सी.) (फिनान्स स्पेशलायझेशनसह) (iv) एज्युकेशन – SSC – ९ पदे (पुरुष – ७ व महिला – २).
पात्रता : १२ वी आणि कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि पदवीला किमान ६० टक्के गुण आवश्यक.
(५) मेटीओरॉलॉजी एन्ट्री – SSC – १० पदे (पुरुष – ८, महिला – २).
पात्रता : १२ वी आणि B. Sc. (फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा B.E./ B.Tech. (कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ आयटी/ मेकॅनिकल इ.) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(vi) व्हेपन सिस्टीम (WS) – SSC – १७ पदे (पुरुष – १४, महिला – ३).
पात्रता : १२ वी (फिजिक्स, मॅथ्स विषयात) किमान ५० टक्के गुण आणि पदवी (कोणतीही शाखा) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
ज्या उमेदवारांनी १०+२ पॅटर्नमधील १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, असेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
ग्राऊंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) ब्रँचसाठीची १ जागा कायदा पदवीधरांसाठी राखीव आहे. (सी) NCC स्पेशल एन्ट्री – फ्लाईंग ब्रँच – PC – (फक्त पुरुष) आणि SSC – (पुरुष/ महिलांसाठी). CDSE मधील १० टक्के जागा PC साठी आणि AFCAT ब्रॅंचसाठीच्या जागांच्या १० टक्के जागा SSC साठी.
पात्रता : (अ) NCC एअर विंग सिनियर डिव्हीजन ‘सी’ सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. (ब) पदवीला (कोणत्याही शाखेतील) किमान ६० टक्के गुण आवश्यक. (क) १२ वीला फिजिक्स आणि गणित विषयांत प्रत्येकी किमान ५० टक्के गुण आवश्यक. पदवी परीक्षेतील CGPA ग्रेड टक्केवारीमध्ये रूपांतर (conversion) करण्याचा पुरावा सादर करणे आवश्यक. (पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सादर करावा. त्यांना पदवी/ पदव्युत्तर पदवीच्या अगोदरच्या सर्व सेमिस्टर्सना किमान सरासरी आवश्यक ६० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे.
SSC ऑफिसर्सना पेन्शन लागू नसेल.
शॉर्ट सर्व्हिस कमिशन : SSC (महिला व पुरुष) – फ्लाईंग ब्रँचमध्ये ऑफिसर्सना १४ वर्षेपर्यंत सेवा करता येईल.
ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल) SSC ऑफिसर्सना १० वर्षांचा सेवाकाल असेल, जो आणखी ४ वर्षांनी वाढविला जाऊ शकतो. पर्मनंट कमिशन ग्रांट करण्याचे शॉर्ट सर्व्हिसच्या शेवटच्या वर्षी ठरविले जाऊ शकते.)
मॅरिटल स्टेटस : कोर्स सुरू होण्यापूर्वी उमेदवार अविवाहीत असणे आवश्यक आहे. ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये विवाह करण्यास परवानगी नाही.
वयोमर्यादा : (अ) फ्लाईंग ब्रँच AFCAT आणि NCC स्पेशल एन्ट्रीसाठी – (१ जुलै २०२५ रोजी) २० ते २४ वर्षे (उमेदवाराचा जन्म दि. १ जुलै २००१ ते १ जुलै २००५ दरम्यानचा असावा.) DGCA कडील कमर्शियल पायलट लायसन्सधारक उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा – २६ वर्षे. (१० वी उत्तीर्ण प्रमाणपत्रातील जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.)
(ब) ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल/नॉन-टेक्निकल) ब्रँचेस – (दि. १ जुलै २०२५ रोजी) २० ते २६ वर्षे (उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९९ ते १ जुलै २००५ दरम्यानचा असावा.)
निवड पद्धती : (१) ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची AFCAT परीक्षा दि. ९, १०, ११ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येईल. AFCAT परीक्षा ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न फक्त इंग्रजी भाषेत असतील. फर्स्ट शिफ्टकरिता उमेदवारांनी सकाळी ८.०० वाजता व दुसऱ्या शिफ्टसाठी उमेदवारांनी दुपारी १३.०० वाजता हजर राहणे आवश्यक.
AFCAT परीक्षा – (ए) जनरल अवेअरनेस, (बी) व्हर्बल अॅबिलिटी इन इंग्लिश, (सी) न्यूमरिकल अॅबिलिटी, (डी) रिझनिंग आणि मिलिटरी अॅप्टिट्यूड टेस्ट एकूण प्रश्न संख्या १००, एकूण गुण ३००, वेळ २ तास. (सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत) (पहिली शिफ्ट (रिपोर्टींग टाईम सकाळी ८.०० वा.), दुसरी शिफ्ट (रिपोर्टींग टाईम दु. १३.०० वा.) दु. १५.०० – १७.०० वाजेपर्यंत)
प्रॅक्टिस टेस्ट : AFCAT साठी ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट https://careerindianairforce.cdac.in किंवा https://afcat.cdac.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
AFCAT परीक्षा केंद्र : कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे, सोलापूर, पणजी, इंदौर, जबलपूर, वडोदरा, भोपाळ, हैद्राबाद, बेंगलुरू इ.
(२) एअर फोर्स सिलेक्शन बोर्ड (AFSB) – NCC स्पेशल एन्ट्री फ्लाईंग ब्रँच ऑप्ट केलेल्या उमेदवारांना सरळ आरइ टेस्ट डेहरादून, म्हैसूर, गांधीनगर, वाराणसी आणि गुवाहाटी यापैकी एका आरइ सेंटरवर द्यावी लागेल. AFCAT मधील पात्र उमेदवारांना आरइ इंटरव्ह्यूची तारीख आणि केंद्र ऑनलाइन https://careerindianairforce.cdac.in किंवा https://afcat.cdac.in या संकेतस्थळावर निवडावे लागेल.
अंतिम निवड लेखी परीक्षा आणि AFSB टेस्टमधील गुणवत्तेनुसार केली जाईल. आरइ इंटरव्ह्यूनंतर निवडलेल्या उमेदवारांना मेडिकल टेस्ट द्यावी लागेल. AFCAT साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपले अॅडमिट कार्ड https://afcat.cdac.in या संकेतस्थळावरून (Download Admit Card) लिंकवरून २७ जुलै २०२४ पासून डाऊनलोड करता येतील. अॅडमिट कार्ड उमेदवारांच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवरसुद्धा पाठवले जातील.
ट्रेनिंग : ट्रेनिंग जुलै, २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून एअरफोर्स अॅकॅडमी, दुंदिगल, हैदराबाद येथे सुरू होईल. ट्रेनिंग दरम्यान फ्लाईट कॅडेट्सना दरमहा रु. ५६,१००/- स्टायपेंड दिले जाईल.
Register for Free Mock Test:
------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
TJSB Sahakari Bank recruitment
मुंबई विद्यापीठातर्फे पेट परीक्षेचा निकाल जाहीर २०२१
एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२०: अॅडमिट कार्ड उपलब्ध