Entrance Exams

Entrance Exams

सीबीएसईतर्फे दहावी, बारावीच्या मायनर विषयांसाठी वेळापत्रक जाहीर २०२१

PUBLISH DATE 22nd October 2021

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड दहावी आणि बारावीच्या मायनर विषयांसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे.

दहावी आणि बारासाठी मायनर विषयांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट cbse.nic.in पाहता येणार आहे. दहावी टर्म १ मायनर विषयांची परीक्षा १७ नोव्हेंबरला चित्रकलेच्या पेपरपासून सुरूवात होणार आहे. ७ डिसेंबरला अरबी, तिबेट, फ्रेंच, जर्मन, रशियन, पारसी, नेपाळी, लिंबू, लेप्चा आणि कर्नाटक आणि म्युझिकच्या पेपर सह समाप्त होणार आहे. त्याचप्रमाणे बारावीची की टर्म १ मायनर विषयांची परीक्षा १६ नोव्हेंबर उद्योग, ब्यूटी आणि वेलनेसच्या पेपरने सुरूवात होऊन ३० डिसेंबर रोजी कृषी आणि मास मीडिया स्टडीजच्या पेपरने समाप्त होईल.

दहावी मायनर सब्जेक्टच्या परीक्षा या बारावीच्या मेजर विषयांच्या परीक्षांसोबत आयोजित केल्या जाणार आहेत. बारावीसाठी माइनर विषयांची परीक्षाही दहावीच्या मेजर विषयांच्या परीक्षेसोबत होणार आहे. थंडीचे हवामान लक्षात घेऊन दहावी आणि बारावीच्या परीक्षा सकाळी साडेदहा ऐवजी ११.३० वाजता सुरु होणार आहेत. आणि वाचनासाठी १५ ऐवजी २० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.

CBSE दहावीचे वेळापत्रक
चित्रकला - १७ नोव्हेंबर २०२१
गुरुंग, तमांग, थाई आदि - १८ नोव्हेंबर २०२१
उर्दू, पंजाबी, बंगाली आदि- २० नोव्हेंबर २०२१
संस्कृत - २२ नोव्हेंबर २०२१

CBSE बारावीचे वेळापत्रक
इंटरप्रेन्योरशिप- १६ नोव्हेंबर २०२१
टेक्सटाइल डिझाईन- १७ नोव्हेंबर २०२१
मार्केटिंग- १८ नोव्हेंबर २०२१
फॅशन स्टडीज- २२ नोव्हेंबर २०२१

परीक्षा केंद्र बदलण्याची संधी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे टर्म १ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. आता सीबीएसईकडून आलेल्या नव्य अपडेटनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रात (CBSE Term 1 Exam Centre) बदल करता येऊ शकतो.

सीबीएसईच्या नोटिसनुसार अनेक विद्यार्थी त्यांची शाळा असलेल्या ठिकाणी सध्या नाहीत असे निदर्शनास आले आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची सुविधा दिली जाईल. विद्यार्थ्यांनी केव्हा आपल्या शाळांशी संपर्क साधायचा याचा तपशली सीबीएसईकडून देण्यात आला आहे.

असा तयार होणार बोर्ड परीक्षेचा निकाल
बोर्ड परीक्षेचा निकाल कसा तयार होईल याबद्दल सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्याची आणि त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी (NEP)च्या शिफारशींचे पालन करीत आहोत. म्हणून आम्ही २ टर्म मध्ये परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. टर्म १ हा वस्तुनिष्ठ प्रकार असेल आणि टर्म २ सब्जेक्टिव्ह असेल असे भारद्वाज म्हणाले.

-----------------------------------------------------------------------------------

शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ मोफत ऑनलाईन सराव परीक्षा

Registration Link- https://vidyarthimitra.org/abvpmockexam

----------------------------------------------------------------------------------

Engineering Aptitude Test organise jointly with DIPEX & ABVP, Maharashtra

Register now- https://vidyarthimitra.org/abvpapti

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.