CBSE

CBSE

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: नोंदणी प्रक्रिया लवकरच

PUBLISH DATE 20th July 2021

CTET 2021साठी नोंदणी प्रक्रियेची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय शिक्षण बोर्ड (CBSE) लवकरच CTET july 2021 साठी नोटिफिकेशन जाहीर करण्याची शक्यता आहे.

या महिन्याच्या अखेरपर्यंत नोटिफिकेशन जाहीर होऊ शकते असे म्हटले जात आहे. यासंदर्भात कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

या परीक्षेसाठी अर्ज करु इच्छिणारे उमेदवार (CTET 2021 Registration)अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

दरवर्षी सीटीईटीची परीक्षा दोनवेळा आयोजित केली जाते. जानेवारी आणि जुलैमध्ये या परीक्षेचे आयोजन होते. गेल्यावर्षीच्या निकालानुसार साधारण २३ लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. CTET साठी अर्ज प्रक्रिा जूनमध्ये सुरु होते. पण अद्याप काही घोषणा झाली नाही. या महिन्याच्या अखेरिस ही घोषणा होईल असे म्हटले जात आहे.

सीटीईटी 2021 पात्रता

सीटीईटी परीक्षेच्या आधी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पदवी आणि बीएड किंवा अन्य मान्यताप्राप्त पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतील.

विविध स्तरांवरील अध्यापनानुसार सीटीईटीचे पेपर नियोजित असतात, त्यामुळे पात्रताही वेगवेगळी असते. अधिक माहितीसाठी उमेदवार सीटीईटी परीक्षा पोर्टल, ctet.nic.in ला भेट देऊ शकतात.

सीटीईटी 2021 अर्ज प्रक्रिया
गेल्या काही वर्षांप्रमाणे, यावर्षी देखील सीटीईटी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. उमेदवार परीक्षा पोर्टल, ctet.nic.in वर उपलब्ध केल्या जाणाऱ्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि यानंतर उमेदवार लॉगइन करून CTET 2021 अॅप्लिकेशन सबमिट करू शकणार आहेत.

सीटीईटी सर्टिफिकेटची वैधता
केंद्र सरकारने पूर्वीची शिक्षक पात्रता परीक्षेची (TET) वैधता संपुष्टात आणली आहे. ही वैधता आयुष्यभर राहणार आहे. शिक्षण मंत्रालय (Education Ministry)ने जारी केलेल्या निर्देशानुसार २०११ पासून टीईटी (Teachers Eligibility Test)ची आयुष्यभराची वैधता असेल.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा