CBSE

CBSE

केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी २०२१: परीक्षेचे शहर बदलण्याची संधी

PUBLISH DATE 29th October 2021

केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) परीक्षेचे शहर बदलण्यासाठी अर्ज विंडो पुन्हा उघडण्याची घोषणा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) केली आहे.

CTET डिसेंबर २०२१ च्या परीक्षेसाठी याआधी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेचे शहर बदलता येणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन हा बदल करता येणार आहे. CBSE ने परीक्षेचे शहर बदलण्यासाठी अर्ज विंडो ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत खुली ठेवण्याची घोषणा केली आहे.

CTET 2021 परीक्षेचे शहर असे बदला
उमेदवारांनी त्यांच्या परीक्षा शहरात सुधारणा करण्यासाठी परीक्षा पोर्टलवर जा. होमपेजवर दिलेल्या 'सीटीईटी डिसेंबर २०२१ साठी अर्ज करा' या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेज खुले होईल. त्यावर उमेदवारांनी त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड हा तपशील भरुन लॉगिन करा.यानंतर उमेदवार त्यांनी आधी निवडलेल्या शहरात बदल करु शकतात.

CBSE ने डिसेंबर २०२१ च्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लेह येथे अतिरिक्त परीक्षा केंद्राची घोषणा करण्यात आली होती. तसेच १८ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर केलेल्या नोटीसनुसार, परीक्षेचे शहर बदलण्याची आणि अर्ज दुरुस्तीची संधी देणार असल्याचेही म्हटले होते. यापूर्वी CTET परीक्षेसाठी २० सप्टेंबर २०२१ पासून अर्ज सुरू झाले होते. त्यानंतर याला मुदतवाढ देण्यात आली आणि २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले.

३ नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज
सीबीएसईने जाहीर केलेल्या ताज्या सीटीईटी २०२१ च्या वेळापत्रकानुसार, उमेदवार आता २८ ऑक्टोबर २०२१ पासून त्यांच्या ऑनलाइन अर्जात सुधारणा करू शकतील. ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत CTET २०२१ अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी विंडो खुली ठेवण्याची घोषणा मंडळाने केली आहे. यापूर्वी अर्ज दुरुस्तीची विंडो २२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत खुली राहणार होती.

एका पेपरसाठी १ हजार आणि दोन्हीसाठी १२०० रुपये शुल्क
सीबीएसईद्वारे सीटीईटी परीक्षमध्ये दोन पेपर घेतले जातात. पहिली ते पाचवीच्या इयत्तांचे शिक्षक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना पेपर १ मध्ये, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी उमेदवारांना पेपर २ मध्ये उपस्थित राहावे लागेल.

सीबीएसई CTET २०२१ च्या नोटीसनुसार, एका पेपरसाठी (पहिली किंवा दुसरी) परीक्षा फी १००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर दोन्ही पेपरसाठी एकूण १२०० रुपये भरावे लागतील. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी दोन्ही पेपरची फी फक्त ६०० रुपये आहे.

CTET परीक्षा १६ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान होणार आहे.सीबीएसईने जाहीर केलेल्या सीटीईटी २०२१ माहिती बुलेटिन आणि १७ सप्टेंबर २०२१ च्या नोटिसनुसार, सीटीईटी डिसेंबर २०२१ परीक्षा १६ डिसेंबर ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान वेगवेगळ्या तारखांना घेण्यात येणार आहे. बोर्डाद्वारे उमेदवारांना दिलेल्या CET २०२१ प्रवेशपत्रावर परीक्षेची तारीख आणि वेळेबद्दल माहिती मिळेल.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

-------------------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021:Engineering & Pharmacy Get complete Admission Guidance without stepping out of your house.WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.