‘राज्यात विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी फक्त ‘सीईटी’ परीक्षेतली मेरिट ग्राह्य धरले जात असल्याने विद्यार्थ्यांची बारावीतील टक्केवारी घसरत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून बारावीच्या गुणांची सरासरीचे ५० टक्के आणि सीईटीचे ५० टक्के यावरून मेरिट लावण्यात येईल. त्यामुळे बारावीचा पाया भक्कम होऊ शकेल,’ असा सूतोवाच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला.
पुण्यातील काही शैक्षणिक संस्थांना भेटी आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी सामंत हे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार एक बैठक घेतली होती. त्यात पुढील वर्षापासून ५० टक्के बारावीचे गुण आणि ५० टक्के सीईटीतील स्कोअर ग्राह्य धरून मेरिट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय, राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ परीक्षांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच पुढील वर्षी जेईईप्रमाणे सीईटी परीक्षा एकदा झाल्यानंतर आठ दिवसांनी विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देता येईल का, याबाबत विचार सुरू आहे. तसेच पुढील वर्षी प्रवेश प्रक्रिया एक जुलैपासून सुरू करण्यात येईल.’
सामंत म्हणाले, ‘राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंसमवेत झालेल्या बैठकीत सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय झाला. हा निर्णय सर्व कुलगुरूंनी घेतला होता. मात्र, काही ठिकाणी प्रचलित पद्धतीनुसार, तर काही ठिकाणी ऑफलाइन एमसीक्यू पद्धतीने परीक्षा होत आहे. परीक्षा पद्धतीत एकसमानता येण्यासाठी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने बैठक घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणीसाठी पावले उचलतील.’
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेतील (अभिमत विद्यापीठ) संग्रहालयाच्या कामासाठी ८ ते १० कोटी रुपये खर्च लागणार असून तो देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून हे विद्यापीठ पर्यटनासाठी खुले करण्याबाबत विचार करण्यात येईल. तसेच डेक्कन कॉलेजमधील वेतन थकीत होणार नाही, याबाबतही पावले उचलली जातील, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठातील विकास कामांसाठी पुढील तीन वर्षात १५ कोटी रुपये टप्प्या-टप्प्याने देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
----------------------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
First-Year Engineering CAP Schedule Announced
College of Engineering Pune intake seats increased 2022
Polytechnic (Diploma) CAP ROUND I Option form filling Started
Mumbai Engineering Colleges Fees Academic Year 2021-22
Pune Engineering Colleges Fees Academic Year 2021-22
Direct Second Year Engineering Schedule for Admission 2021-22
Universities in Maharashtra & their Jurisdiction
BE / BTech Government & Autonomous Colleges in Maharashtra
अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार: जाणून घ्या
सीईटी प्रवेश परीक्षेसाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत