बारावीनंतर पुणे विद्यापीठात तीन नवे अभ्यासक्रम सुरू;ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १ जुलै

बारावीनंतर पुणे विद्यापीठात तीन नवे अभ्यासक्रम सुरू;ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १ जुलै

बारावीनंतर पुणे  विद्यापीठात तीन नवे अभ्यासक्रम सुरू;ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १ जुलै

बारावीनंतर पुणे विद्यापीठात तीन नवे अभ्यासक्रम सुरू;ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १ जुलै

Course levelUG/PG
Application Start Date Application End Date

1st June 2019

1st July 2019

Admission Details:

पोस्ट-डॉक्‍टरल फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे विद्यापीठाचे आवाहन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या पोस्ट-डॉक्‍टरल फेलोशिपसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. डॉक्‍टरेट केलेल्या (पीएच. डी.) विद्यार्थ्यांना पीएच. डी. नंतर संशोधनाच्या अधिक चांगल्या संधी मिळाव्यात, या हेतूने विद्यापीठात गेल्या वर्षीपासून विविध विषयांमध्ये पोस्ट-डॉक्‍टरल फेलोशिप सुरू करण्यात आली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षातही ही फेलोशिप दिली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील रहिवासी असणाऱ्या पीएच.डी. धारकांना अर्ज करता येणार आहे. याबाबतची अधिक माहिती http://www.unipune.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लिबरल आर्टस, ब्लेंडेड बी. एस्सी. आणि मास्टर ऑफ डिझाइनची जुलैमध्ये प्रवेश परीक्षा
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लिबरल आर्टस (बीए), बी. एस्सी. ब्लेंडेड आणि मास्टर ऑफ डिझाइन हे तीन अभ्यासक्रम यंदापासून सुरू केले आहेत. विद्यापीठाच्या आवारातील इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्स विभागामध्ये हे अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून, १ जुलै ही अंतिम तारीख आहे.

विज्ञान, कला, मानव्यविद्या अशा विविध विद्याशाखांमधील अनेक विषयांची एकमेकांशी सांगड घालणारा, तसेच गरज आणि आवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य देणारा ‘लिबरल आर्टस’ हा अभ्यासक्रम आहे. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम असून, कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा देऊ शकतात. लिबरल आर्टस शिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक उद्योगांमध्ये आणि विशेषतः डिजिटल क्षेत्रातील उद्योगांमध्ये प्राधान्य दिले जात आहे.

विज्ञानातील विविध विषयांचा समन्वय साधणे, हे सूत्र मध्यवर्ती ठेवून ‘बी. एस्सी. ब्लेंडेड’ या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरू शकतात. तीन वर्षांच्या या अभ्यासक्रमामध्ये पहिली दोन वर्षे विद्यार्थी विज्ञानातील मूलभूत विषय शिकतील. शेवटच्या वर्षात विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि अर्थशास्त्र या चारपैकी एका विषयाचा पदवीपातळीवर सखोल अभ्यास (स्पेशलायझेशन) करता येणार आहे. ब्लेंडेड अभ्यासक्रमाला ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाचे सहकार्य मिळाले आहे. या पदवीची गुणवत्ता मेलबर्न विद्यापीठ आश्वासित करणार असल्यामुळे ही पदवी जगभर त्या विद्यापीठाच्या पदवीशी समकक्ष मानली जाणार आहे. परदेशामध्ये विज्ञानविषयक उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

विद्यापीठाचा तिसरा अभ्यासक्रम ‘डिझाइन’शी संबंधित आहे. मास्टर ऑफ डिझाइन (एमडेस) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे. बी. ई./बी. टेक. किंवा पाच वर्षांचा बी. आर्क किंवा चार वर्षांचा बी. डेस ही पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. 

या अभ्यासक्रमांसंबंधी अधिक माहिती तसेच ऑनलाइन प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या ‘https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off App https://goo.gl/rT2vXd

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

------------------------------------------------------------------------------