परीक्षा कधी होणार? की रद्द होणार? हे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत. दहावीच्या परीक्षा तर रद्दच झाल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी तर गॅजेट्सना जवळ केलं आहे. पण मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करिअरसाठी होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात. तो कसा हे आजच्या लेखातून जाणून घेऊ या...
मागील वर्षापासून अनेक गोष्टी झपाट्याने बदलत आहेत आणि प्रत्येक जण 'न्यू नॉर्मलशी' आपापल्यापरीनं जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक पिढ्यांची प्रार्थना खरी ठरावी आणि विद्यार्थ्यांना काहीशी दिलासादायक बातमी मिळावी ती म्हणजे रद्द झालेल्या परीक्षा! अनिश्चितता आणि तारखांमधील सततच्या बदलांमुळे 'बोर्ड एक्साम्सच्या' गांभीर्यापेक्षा 'बोअर्ड ऑफ एक्साम्स' अशी काहीशी विद्यार्थ्यांची मनस्थिती निर्माण झाली आहे. खरंच परीक्षेची किती तयारी झाली आहे यापेक्षा लवकरात लवकर परीक्षा देऊन टाकू, जेणेकरून अभ्यास करायचा की नाही करायचा हा गोंधळ तरी संपेल असं जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असेल. या बदलाची सुरुवात केवळ एका बोर्डाच्या निर्णयानं जरी झालेली असली तरी बोर्ड परीक्षा रद्द होण्याची कल्पना वास्तवात येईल असं खरंच कोणाला वाटलं नव्हतं. या निर्णयामुळे विद्यार्थ्यात स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली. तसंच ताबडतोब पुस्तकांची जागा गॅजेट्सनी घेतली. पुढील प्रवेशप्रक्रिया कशी आणि कधी होणार, सध्याच्या लॉकडाउनमुळे मुलांना गॅजेटमुक्त वातावरणात कसं ठेवलं पाहिजे इत्यादी विचारांनी पालकांच्या चिंतेत आणखी भर पडली.
संख्या जरी लहान असली तरी या लॉकडाउनच्या काळात देखील शिस्तबद्ध जीवन व्यतीत केलेल्या, मौजमजा करण्यापेक्षा आपली स्वप्नं साकार करण्यासाठी अभ्यासाची चांगली तयारी करणाऱ्या विदयार्थ्यांना हा निर्णय अनुचित वाटला असेल. उत्तम कामगिरी करण्याची संधी अशी अचानक हिरावून घेतल्यामुळे निराशाजनक वाटणं स्वाभाविक आहे. तेव्हा आपले सगळे प्रयत्न वाया गेले असा विचार करण्यापेक्षा आपली आधीच तयारी झाली आहे असा विचार करा.
दुसरीकडे परीक्षा अचानक रद्द केल्यामुळे कमी झालेला ताण, उत्तम कामगिरी करण्याचं ओझं उतरल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण लक्षात घ्या ही केवळ एकच परीक्षा रद्द झालेली असून ज्या संकल्पनांची तुमची पुरेशी तयारी झाली नाही अशा संकल्पना पुढे कधीच उपयुक्त ठरणार नाहीत असं नाही. त्यामुळे रद्द झालेल्या परीक्षांच्या परिणामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नका.
परीक्षांकडे जीवनात पुढे घेऊन जाणाऱ्या चरणापेक्षा केवळ उत्तम कामगिरी करणं महत्त्वाचं आहे या दृष्टिकोनातून पहिलं जातं, मनावर कायम बिंबवलं जातं. याचा परिणाम म्हणजे भीती, यश, अपयश, दबाव, तणाव इत्यादी जणूकाही परीक्षा या संकल्पनेचे समानार्थी शब्द बनले आहेत. गुणांच्या चढाओढीमुळे वर्षभर शिकलेले विविध विषय, संकल्पना यावर एखाद्याचे प्रभूत्व किती आहे हे सिद्ध करण्याचं साधन म्हणून परीक्षांकडे पाहण्यास कधीही प्रोत्साहित केलं गेलं नाही.
लक्षात घ्या, संकल्पना किती समजली आणि पुढील स्तरावरील अभ्यास करण्यास विद्यार्थी किती तयार आहेत हे समजून घेण्यासाठी परीक्षा हे नक्कीच प्रभावी साधन आहे. म्हणूनच करिअरचा पाया घालण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम शिकण्याची आपली किती तयारी झाली आहे हे विद्यार्थ्यांनी अत्यंत बारकाईने तसेच वस्तूनिष्ठपणे समजून घेणे आवश्यक आहे. ज्यांची अजूनही विषयांची नीट तयारी झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, भविष्यात परीक्षा आयोजित केल्या जातील तसेच तुम्ही आत्तापर्यंत जे काही शिकलात त्याचा परिणाम पुढील शिक्षणावर होणार आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे आनंदी वाटणं साहजिक आहे पण यामुळे शिक्षणाचं महत्त्व कमी होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. काही कालावधीनंतर पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करा, पुढील करिअरसाठी आवश्यक पावलं उचला.
छोटासा ब्रेक घेणं योग्य आहे, पण शक्य तितक्या लवकर विविध गोष्टी शिकण्याच्या मार्गावर परत जा. लक्ष केंद्रित करा. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीबद्दल विचार करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अधिक करिअर पर्याय आजमावून बघा. स्वत:ला अधिक जाणून घ्या आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी योजना आखा. लक्षात ठेवा, केवळ परीक्षा रद्द झाल्या आहेत, शिक्षण आणि शिकणं नाही!
Career Opportunities in Physiotherapy
UPSC Exam Preparation Tips
दातांचे डॉक्टर व्हायचंय?
Career In Fashion Designing
एनसीसी उमेदवारांना भारतीय सैन्यात थेट अधिकारी होण्याची संधी
‘डिझाइन’मध्ये करिअर करायचंय?
माझी स्पर्धा परीक्षा: ‘प्लॅन बी’ वेळेत निश्चित करा
AI Trends 2024
वर्क फ्रॉम होम करायचे आहे? मग, ‘हे’ करिअर ऑप्शन आहेत बेस्ट
These are the top 5 Indian cities with highest employer intent
How To Prepare For NEET UG Along With Class 12 Board Exam
MPPSC Result 2019 Out
Skill Development Courses 2024
UPSC Free Coaching
Career Tips
एनआयटी एमसीए कॉमन प्रवेश परीक्षा
नवीन शैक्षणिक धोरणातही ‘एआय’चा समावेश!
स्पर्धेत धावण्यापूर्वी
जाहिरात क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग, ‘हे’ कोर्सेस तुम्ही करायलाच हवेत
Career Tips
एमपीएससीची तयारी
डिजिटल मार्केटिंग - काळाची गरज
Career Options for Arts Stream
करिअर घडविताना : आर्किटेक्चरसाठी प्रवेश प्रक्रिया
नोकरीची संधी
स्पर्धेत धावण्यापूर्वी:कौशल्ये शिकणे गरजेचे
तुम्हाला Apple मध्ये जॉब कसा मिळू शकतो?
Career In Railways
करिअरमध्ये अपयशाची चिंता न करता शिकत राहणे महत्वाचे
UPSC-MPSC : समुद्राची पातळी वाढणे म्हणजे काय
कॉर्पोरेट कम्युनिकेटर बनायचंय? जाणून घ्या या क्षेत्रातील संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: जॉइंट एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट
विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: पाठांतराच्या 'या' सोप्या टिप्स नक्की वाचा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: विदेशात शिक्षणाची संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आज अखेरची संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नऊ रंग करिअरचे
विद्यार्थी पालक संवाद २०२३: स्पर्धा जिंकण्यासाठी ‘एआय’ आधारित मार्केटिंग
विद्यार्थी पालक संवाद २०२३: खगोल भौतिकी प्रवेश परीक्षा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
Career Guidance 2023: Important tips for UPSC Interview round
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरीसाठीच स्पर्धा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: ध्यानधारणा आणि अभ्यास
विद्यार्थी पालक संवाद २०२३: उच्च शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य
विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे करिअर क्षेत्र
विद्यार्थी पालक संवाद २०२३: जॉईंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर
विद्यार्थी पालक संवाद २०२३: एनडीएच्या परीक्षेची तयारी कशी करावी?
विद्यार्थी पालक संवाद २०२३: सामाजिक मानसशास्त्र वृत्ती
विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
विद्यार्थी पालक संवाद २०२३: विपश्यना आणि जीवन
विद्यार्थी पालक संवाद २०२३: कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट
विद्यार्थी पालक संवाद २०२३: एक्साइज इन्स्पेक्टर
विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘स्टेम’ क्षेत्रातील मुलींचे शिक्षण आणि प्रतिनिधित्व
विद्यार्थी पालक संवाद २०२३: तुम्हाला प्रश्न पडतात का?
विद्यार्थी पालक संवाद २०२३: कौशल्याधिष्ठित जगाचा ‘स्किल्ड’ पासवर्ड
विद्यार्थी पालक संवाद २०२३: संवादाचं कौशल्य
विद्यार्थी पालक संवाद २०२३: गुगल कंपनीमध्ये इंटर्नशिप आणि नोकरीची सुवर्णसंधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: हिंदी भाषेमधील करिअरचे पर्याय
महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट-अ’ पदांची भरती २०२३
विद्यार्थी पालक संवाद २०२३: सांस्कृतिक उपक्रमावरील सहअभ्यासक्रम
SSC CGL Result 2023: CGL Tier 1 declared
विद्यार्थी पालक संवाद २०२३: सर्वोच्च व्यावसायिक करिअर!
विद्यार्थी पालक संवाद २०२३: ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग
विद्यार्थी पालक संवाद २०२३: कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
वाटा करिअरच्या २०२३: इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा
वाटा करिअरच्या २०२३: बी.टेक मध्ये सर्वाधिक प्लेसमेंट असलेले ट्रेड जाणून घ्या
वाटा करिअरच्या २०२३: पेंट टेक्नॉलॉजीमध्ये करिअर संधी
वाटा करिअरच्या २०२३: डिझास्टर मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर संधी
वाटा करिअरच्या २०२३: संगणकासह संलग्न शाखांकडेच कल
विद्यार्थी पालक संवाद २०२३: विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडथळे
विद्यार्थी पालक संवाद २०२३: परदेशी शिक्षणासाठी चेवनिंग शिष्यवृत्ती
विद्यार्थी पालक संवाद २०२३: बाह्य व्यक्तिमत्त्व
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नर्सिंग वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम करिअर
विद्यार्थी पालक संवाद २०२३: ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग
वाटा करिअरच्या २०२३: फॅशन इंडस्ट्रीमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी
वाटा करिअरच्या २०२३: नोकरीच्या चांगल्या संधीसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम
Indian Coast Guard Recruitment 2023
वाटा करिअरच्या २०२३: मुक्त, दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीचे शिक्षण
ISRO IPRC Admit Card out for CBT 2023
विद्यार्थी पालक संवाद २०२३: फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी
Student Parent Dialogue 2023: MBA Entrance Exam