Schools

Schools

गुण ( मार्क्स ) व गुणवानांचा चक्रव्युह कायमच !

PUBLISH DATE 2nd August 2020

गुण ( मार्क्स ) व गुणवानांचा चक्रव्युह कायमच !

              विद्यार्थी  विकासासाठी पालक, शिक्षक, शासन काम करत असते. सुरुवातीला शाळेचे निकालही शंभर टक्के  लागण्याचे  प्रमाण कमी  होते.पंरतु काही मुले गुणवत्ता यादीत चमकत !

             आता मात्र गुणवत्ता यादी नाही त्यामुळे गुणवत्ता मोजण्याची फुटपट्टी नाही. शाळांचा संख्यात्मक निकाल सुधारला व बहुतेक शाळांना शंभर टक्के निकालाच्या पंरपरेची मेडल मिळाली व ती शाबुत ठेवण्यात शाळा व शाळेचे घटक अटोकाट प्रयत्न करत असतात. पालकही मुलांच्या गुणांच्या शर्यतीत अग्रेसर असतात शाळेनंतर खाजगी शिकवणी वर्ग, वेगवेगळ्या प्रकाशनांची पुस्तके असे बरेच काही करत असतात.गुणात्मक निकाला विषयी भाष्य करायचे झाले तर मुलांचा वैयक्तिक टक्काही वधरला. नवद्दीची मायंदळी सर्रास दिसते. आता असे वाटते संख्यात्मक व गुणात्मक विकास मोठया प्रमाणात कागदावर झालेला दिसतो. मात्र गुणवानांचे काय?गुण मिळाले म्हणजे, गुणवान झाले का ? गुण त्या विषयात घोकनंपट्टी करून मिळविलेली सनद म्हणावी लागेल. गुणवान म्हणजे त्या विषयात मिळविलेले पारंगत्य वा पांडित्य होय.

           आजच्या भाषेत बोलायाचे झाले तर मास्टर ऑफ फिलोसॉफी मिळविणाऱ्या पंडीतांची कमी नाही. कारण हे पांडित्य कागदावर मिळवायचे असते. कागदी घोडे नाचविणाऱ्यांची कमी या जगात नाही. पंरतु हे पांडित्य समाजभिमुख किती आहे ? याची फुटपट्टी कोणत्या विद्यापीठांकडे असेल तर असो.ज्या देशात युवकांचे प्रमाण जास्त आहे त्या देशात बालकांचा मोफत शिक्षाणाचा हक्क आहे. शैक्षणिक धोरण व धोरण ठरविणाऱ्या संस्था आहे. शिकणारी मुले पास होण्याची खात्री आहे. त्यामुळे मुले शिकत आहे का ? शिक्षणाची गोडी मुलांना आहे का ? याने आपण संख्यात्मक व गुणात्मक विकासाचे मनसुबे बांधत आहोत. गुण मिळविले म्हणतो पण गुणवानांचे काय ?  शिक्षणाने गुणांची प्रमाणपत्रे मिळतील पंरतु गुणवानांचा टक्का हातावर मोजता येईल एवढाच का ? यावर मंथन करण्याची गरज आहे.

                  गुणधारकांची व गुणवानांची उदाहरणे बघु या. आईनस्टाईन गुणधारक की गुणवान होते? ज्या आईनस्टाईनला शाळेत गुण मिळत नाही म्हणुन शिक्षकांनी आईला कळविले.त्याच आईन्सटाईनला आईने गुणवान बनविले. शिक्षणाचे दालन ज्यांनी समाजासाठी खुले केले त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्याकडे गुणांची प्रमाणपत्र नव्हे तर गुणवानपणा होता.  रयतेचा शिक्षणाचा वटवृक्ष ज्यांनी उभा केला त्यांच्याकडे गुणांची लेबले नव्हते तर  गुणवानपणा होता. म्हणून त्यांनी समाजाची दशा बघुन दिशा दिली.

                राजकारणी यशवंतराव चव्हाण, पेपरबॉय ते मिसाईल मॅन डॉ. ए पी जी अब्दुल कलाम, चहावाला ते पी एम नरेंद्र मोदी, टांगेवाला ते मसालेवाला एम डी एच,समाजसेवक अण्णा हजारे, उद्योगपती धीरूभाई आंबानी, क्रिडा धुरंधर मिल्खा सिंग , बीजमाता राहीबाई पोपेरे , अनाथांची माई सिंधुताई सपकाळ........... गुणधारक की गुणवान ? सचिन तेंडुलकर , मास्टर ब्लास्टर बनण्यासाठी वा भारतरत्नाने गौरविण्यासाठी गुण नव्हे गुणवानपणा सार्थ ठरला.

                 गुणांची कवचकुंडले लावुन नोकर होऊन सॅल्युट ठोकता येईल, पण गुणवानाच्या खाणीत नवदृष्टी व समाजाभिमुख उपयोगीता असते, जी आज आपण अनुभवतो.पण सर्वांना आर्कषण असते ते कवचकुंडलांचे ! पालकांनाही गुणांची अपेक्षा असते की ज्यात त्यांना आपली अधुरी स्वप्ने दिसत असतात. याच ओझ्यांनी आजचे अभिमन्यु चक्रव्युहात प्रवेश करत असतात आणि पुर्णपणे गुरफटले जातात.

                गुणांची बिरूदे मिळविल्यांचे पुढे काय होते ? हा ही मंथनाचा व शोधाचा विषय आहे. ढोबळमानाने, विचार प्रक्रियेचा, निर्णयक्षमतेचा, नवनिर्माणाचा भाग होण्याऐवजी गुणवानांची स्वप्ने साकारण्यासाठी ही आपली आयुष्य घासतात. कारण यांचा समज असतो घासल्याने आयुष्य प्रकाशमान होते पण रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या काजव्यांची स्वप्ने पाहणारी ही आकाशगंगेतील दैदिप्यमान तारे असतात. पण गुणांच्या भाऊगर्दीत गुणवानांला कात्री लागते आणि रात्र-रात्र रट्टा मारून गुणांच्या मिळकतीत आयुष्याची मिळकत शोधत यांचे जीवन मार्गी लागते. गुणवानांच्या वाटेला आले असते तर जीवन मार्गी लावणारे समाजाला मार्ग दाखविणारे दिपस्तंभ झाले असते.  

                            गुणवान हे गुणांच्या चक्रव्युहात तर सापडले नाही ना ? शिक्षण  व्यवस्थेने अंर्तमुख होणे गरजेचे आहे. गुणांच्या खिरापतीला सुद्धा शिक्षणव्यवस्थेत पत राहिली पाहिजे. गुणधारक चागंल्या शिक्षण प्रवेशासाठी उंबरठे झिजवितांना व चांगल्या नोकरीच्या प्रतिक्षा लाईन मध्ये उभे दिसतात.  या अभिमन्युनां चक्रव्युह छेदण्याचे सामर्थ्य लाभो ! हीच सदिच्छा. 

शब्दांकन : शशीकांत गमे, सह शिक्षक, ज्ञानगंगा विदयानिकेतन, मांचीहिल, संगमनेर

नोंद : शिक्षक व विद्यार्थी आपणही आपले मनोगत आम्हाला नक्की कळवा विद्यार्थी मित्र पोर्टल वर आम्ही प्रकाशित करू WhatsApp 7720025900 

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

          


Related News


गुण ( मार्क्स ) व गुणवानांचा चक्रव्युह कायमच !
30th January 2024

MPSOS Result 2023

गुण ( मार्क्स ) व गुणवानांचा चक्रव्युह कायमच !
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

गुण ( मार्क्स ) व गुणवानांचा चक्रव्युह कायमच !
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

गुण ( मार्क्स ) व गुणवानांचा चक्रव्युह कायमच !
27th December 2023

NIOS Result 2023 Out

गुण ( मार्क्स ) व गुणवानांचा चक्रव्युह कायमच !
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

गुण ( मार्क्स ) व गुणवानांचा चक्रव्युह कायमच !
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

गुण ( मार्क्स ) व गुणवानांचा चक्रव्युह कायमच !
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

गुण ( मार्क्स ) व गुणवानांचा चक्रव्युह कायमच !
22nd June 2023

JNVST Result 2023