Higher Education

Higher Education

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर: सुधारित वेळापत्रक लवकरच

PUBLISH DATE 16th October 2020

पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या ३३५ विषयांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाकडून येत्या काही दिवसांत जाहीर केले जाणार आहे. दरम्यान, आज शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार असून, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पुणे विद्यापीठाकडून विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत. मात्र, बुधवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले. या पावसामुळे अंतिम वर्षाच्या ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण झाली; तसेच अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा देण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या. त्यातच भर म्हणजे बुधवारी रात्री विद्यापीठाच्या डेटा सेंटरमध्ये तांत्रिक अडचणी उद्भवल्या. त्यानंतर तंत्रज्ञांनी काम करून गुरुवारी दुपारी डेटा सेंटर पुन्हा सुरळीत सुरू केले.

या एकूणच परिस्थितीमुळे बुधवारच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. विद्यापीठाकडून गुरुवारी पदवी, पदव्युत्तर पदवी स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या ३३५ परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'
विद्यार्थी मित्रजॉईन करा आणि मिळवा न्यूजनोकरीशासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी७७२०० २५९०० मेसेज पाठवा.