Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: इतक्यात नको ‘अभ्यासाची’ घाई; पालकांना सल्ला

PUBLISH DATE 24th June 2022

प्रसंग एक -

‘बाई, माझ्या मुलाला ‘ए टू झेड’ येतं का हो!, तो अभ्यास नीट करतो ना!’ नुकतेच नर्सरीला प्रवेश घेतलेल्या प्रणवची आई श्वेता (नाव बदललेले आहे) शिक्षकांना विचारत होती. तेवढ्यात दुसरीकडून मीराच्या आईने आवाज दिला, ‘टीचर, मीराला सरळ, आडवी, उभी रेष काढायला येतीयं का! आणि तिला ‘वन टू टेन’ कळायला लागलंय का हो.’

प्रसंग दुसरा -

कोरोनामुळे दोन वर्षे ऑनलाइन शिक्षण घेतल्यानंतर स्वराज आता इयत्ता पहिलीचे शिक्षण घेत असून तो पहिल्यांदाच शाळेत जाऊ लागलायं. ‘‘मॅडम, स्वराजच्या वर्गाला तुम्ही काय गृहपाठ दिलायं. मी घरी त्याच्याकडून काय-काय करून घेऊ. त्याला लिहिण्यासाठी काय दिले आहे.’ असे स्वराजचे वडील अगदी घाई-घाईत शिक्षकांना विचारात होते.

या दोन्ही प्रसंगात विद्यार्थी हे पहिल्यांदाच शाळेत जात आहेत. शाळा सुरू होऊन अगदी आठवडा झाला आहे. त्यामुळे मुलांना अभ्यास काय शिकविला, त्यांना काय-काय अभ्यास येतोय, घरी काय अभ्यास करून घ्यायचा, हे विचारण्याची घाई पालकांना लागल्याचे दिसत असल्याने शिक्षकांना असंख्य प्रश्न विचारले जात आहेत. परंतु मुलांच्या वयाचा विचार करता, त्यांना त्याच्या गतीने आणि कलाने घडू देण्यासाठी पालकांनी थोडा संयम दाखवायला हवा. अभ्यासाची अति घाई करून नये आणि अभ्यासाविषयी अतिरेकी तगादा शिक्षकांकडे लावू नये, असा सल्ला शिक्षक, समुपदेशक पालकांना देत आहेत.

पालकांसाठी टिप्स...

  • मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक अशा सर्वांगीण विकासाबाबत संयम ठेवा

  • शाळेच्या सुरुवातीच्या काळात शाळेची ओढ मुलांना वाटू देत

  • वयानुसार त्यांना शाळेत शिकवलं जाणारच आहे, त्याची घाई नको

  • मुलांना त्यांच्या गतीने आणि कलेने घडायला पुरेसा वेळ द्या

  • अभ्यास, सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे, याचा अतिरेक आणि घाई टाळा

  • मुलांच्या मानसिकतेचा विचार करा

  • अभ्यासाचे ओझे लहान वयात वाटू देऊ नका

पालकांनी मुलांच्या कलाने घ्यावे. शाळेत गेल्या-गेल्या मुलांना अभ्यास आलाच पाहिजे, अशी घाई करू नका. शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मुलांवर अभ्यासाचा अतिरिक्त दबाव टाकल्यास अशा मुलांना शाळा, अभ्यास याबाबत भीती निर्माण होऊ शकते. त्याशिवाय ती नैराश्यात जाऊ शकतात. किंवा अगदी लहान वयात त्यांना आपण स्पर्धेत असून आपल्याला काय येते आणि काय येत नाही, याचीच चिंता सतावू लागेल.

- आरती पेंडसे, मानसतज्ज्ञ

शाळा सुरू झाली की, आज काय शिकवले, काय गृहपाठ दिला हे, विचारण्याच्या मागे पालक लागतात. शाळा सुरू झाल्यावर मुलांना शाळेत रमविण्यासाठी शिक्षक प्रयत्न करतात. अभ्यासाची घाई पालकांनी सुरुवातीपासून करू नये. मुलांनी इतरांमध्ये मिसळणे, शिक्षकांशी जवळीक निर्माण करणे, शाळेची ओढ वाटणे, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. शिक्षक हे इयत्तानिहाय आखून दिलेल्या पद्धतीने मुलांना घडवीतात.

- कल्पना वाघ, मुख्याध्यापिका, नवीन मराठी शाळा

लेख लेखक - मीनाक्षी गुरव

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी-पालक संवाद २०२२: इतक्यात नको ‘अभ्यासाची’ घाई; पालकांना सल्ला
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: इतक्यात नको ‘अभ्यासाची’ घाई; पालकांना सल्ला
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: इतक्यात नको ‘अभ्यासाची’ घाई; पालकांना सल्ला
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: इतक्यात नको ‘अभ्यासाची’ घाई; पालकांना सल्ला
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: इतक्यात नको ‘अभ्यासाची’ घाई; पालकांना सल्ला
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: इतक्यात नको ‘अभ्यासाची’ घाई; पालकांना सल्ला
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: इतक्यात नको ‘अभ्यासाची’ घाई; पालकांना सल्ला
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: इतक्यात नको ‘अभ्यासाची’ घाई; पालकांना सल्ला
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: इतक्यात नको ‘अभ्यासाची’ घाई; पालकांना सल्ला
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: इतक्यात नको ‘अभ्यासाची’ घाई; पालकांना सल्ला
28th November 2023

Career In Railways