जिल्हा परिषदांच्या शाळांमधील केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे पदोन्नतीने, तर ५० टक्के पदे विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी घेतला आहे.
त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद शाळांसाठीच्या केंद्र प्रमुखांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य परीक्षा परिषदेमार्फत विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येईल. ही प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास, सरकारी शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मदत होणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचे नियोजन, विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकवणे, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी चार हजार ८६० केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्यात आल्या. दहा शाळांसाठी एक केंद्र याप्रमाणे चार हजार ८६० केंद्र प्रमुखांची पदे निर्माण करण्यात आली. राज्य सरकारने २०१०मध्ये केंद्रप्रमुख भरतीसाठी सरळसेवा, पदोन्नती आणि मर्यादित भरती परीक्षेसाठी ४०:३०:३० असे प्रमाण निश्चित करण्यात आले.
त्यानुसार २०१४मध्ये ग्रामविकास विभागाने केंद्र प्रमुखाचे सेवा प्रवेश नियम, २०१७मध्ये कार्यपद्धती निश्चित केली. मात्र, या कार्यपद्धतीनुसार पदे भरली जात नसल्याचे दिसल्याने भरतीचे प्रमाण बदलण्यात आले आहे. त्यानुसार आता ५० टक्के पदे पदोन्नतीने, तर ५० टक्के पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमाचे स्वरूपही जाहीर करण्यात आले. पदोन्नतीने नियुक्तीसाठी शिक्षण सेवक कालावधी वगळून अखंड नियमित तीन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांमधून सेवाज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारे निवड करण्यात येईल. कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. सद्य:स्थितीत पदोन्नतीच्या कोट्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक पदे असल्यास ती पदे रिक्त होत जातील, तशी स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीही
स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी होईल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेतली जाईल. उपलब्ध रिक्त पदे विचारात घेऊन परीक्षा आयोजित केली जाईल. परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात येईल. या परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे असेल, तर किमान ५० टक्के गुणांसह पदवी आणि शिक्षण सेवक कालावधी वगळून अखंड नियमित तीन वर्षे सेवा पूर्ण केलेले शिक्षक परीक्षेसाठी पात्र असतील. जिल्हा परिषदेचे शिक्षक कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यासाठी पात्र असतील, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
BPSC 68th Prelims Admit Card Releasing Today 2023
Department of Atomic Energy to Recruit Group A 2023: Details here
IGNOU launches MA Programme in environmental studies 2023
India Post GDS Recruitment 2023: Apply for Posts
WBJEEB JECA-2023: Registration begins
IB Recruitment 2023: Registration for MTS, SA/EXE Posts Begins